TRENDING:

आज PM Kisan चा हप्ता किती वाजता खात्यात जमा होणार? कुणाला पैसे मिळणार? अपडेट आली समोर

Last Updated:
PM Kisan Yojana 21 Installment : राज्यातील तब्बल 90.41 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित केला जाणार आहे.
advertisement
1/5
PM Kisan चा हप्ता किती वाजता खात्यात जमा होणार? कुणाला पैसे मिळणार?
राज्यातील तब्बल 90.41 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या हप्त्याची शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा असते आणि यंदाचा हप्ता देखील थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
advertisement
2/5
कोयंबतूरमधून पंतप्रधानांकडून हप्त्याचे वितरण - तमिळनाडूतील कोईंबतूर येथील विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12.40 वाजता ऑनलाइन प्रणालीद्वारे या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
advertisement
3/5
पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम - या कार्यक्रमाला ऑनलाइन प्रणाली द्वारे पुणे कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि अनेक शेतकरी प्रतिनिधी या प्रसंगी सहभागी होणार आहेत.
advertisement
4/5
महाराष्ट्राला मिळणार 1808 कोटी रुपये - आजपर्यंत PM Kisan च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातील वीस हप्त्यांमधून एकूण 37,502 कोटी रुपये जमा झाले आहेत. एकविसाव्या हप्त्यामध्ये राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1808 कोटी रुपये जमा होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण शासनाच्या pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून होणार आहे.
advertisement
5/5
कोणत्या शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत? - योजनेच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांना e-KYC करणे अनिवार्य आहे. e-KYC नसल्यास हप्ता रोखला जातो. त्यामुळे e-KYC न केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच पती पत्नी पैकी एकालाच पैसे मिळणार नाही. जमीन नोंद (7/12 किंवा इतर मालकी नोंदी) चुकीच्या असल्यास किंवा संबंधित विभागाने पात्रता नाकारल्यास हप्ता मिळत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
आज PM Kisan चा हप्ता किती वाजता खात्यात जमा होणार? कुणाला पैसे मिळणार? अपडेट आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल