मोजणी नकाशा ते चतु:सीमेपर्यंत! शेतजमीन खरेदीचा नवीन नियम काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture New Rules : राज्य शासनाने शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवा नियम लागू केला आहे.
advertisement
1/5

राज्य शासनाने शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार आता शेतजमीन खरेदी करताना मोजणीचा नकाशा आणि चतु:सीमा निश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
2/5
हा निर्णय काही दिवसांपूर्वी महसूल व वन विभागाने घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना देण्यात आले आहेत.
advertisement
3/5
मात्र, या नव्या नियमामुळे शेतकरी आणि जमीन खरेदीदारांमध्ये संभ्रम आणि अडचणी वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
advertisement
4/5
नवीन नियम काय? महसूल व वन विभागाने नोंदणी प्रक्रियेसंदर्भात जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेल्या तुकड्यांच्या म्हणजेच 10 आर व 20 आर क्षेत्राच्या शेतजमिनीच्या खरेदीखतासाठी मोजणी नकाशा आवश्यक करण्यात आला आहे.
advertisement
5/5
तसेच हा नकाशा सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीने तयार केलेला असणे बंधनकारक आहे. मात्र, २० आरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी मोजणी नकाशाची अट लागू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.