TRENDING:

'हो, माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी केलेली', मग का जुळले नाहीत सूर? पहिल्यांदाच बोलले सुरेश वाडकर

Last Updated:
Madhuri Dixit - Suresh Wadkar : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांच्या लग्नाची बोलणी झाल्याचं गायकानं पहिल्यांदाच सांगितलं. मग दोघांचे सूर कुठे बिघडले? नेमकं काय झालं?
advertisement
1/10
'हो, माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी केलेली', मग का जुळले नाहीत सूर?
लाखो दिलो की धडकन बॉलिवूडची धकधक गर्ल आजही तितकीच सुंदर दिसते. माधुरी जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा अनेक तरुण तिच्या मागे होते. अनेक अभिनेत्यांबरोबर तिचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण माधुरीनं मात्र अरेंज मॅरेज करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पण तुम्हाला माहितीये का माधुरीचं एका प्रसिद्ध गायकाबरोबर लग्न होणार होतं. माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणीही केली होती. मग का झालं नाही लग्न? 
advertisement
2/10
माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचं लग्न होणार आहे. माधुरीच्या आई-वडिलांनी सुरेश वाडकर यांच्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलणी देखील केली होती. सुरेश वाडकर यांनी पहिल्यांदा याप्रकरणी भाष्य केलं आहे. 
advertisement
3/10
साहित्य आज तक 2025 मध्ये बोलताना सुरेश वाडकर यांनी माधुरीसोबत त्यांचं लग्न होणार होत याची कबूली दिली. माधुरीच्या पालकांनी लग्नाची चर्चा केल्याचं सांगितलं. 
advertisement
4/10
सुरेश वाडकर म्हणाले, "हो तिच्या पालकांनी येऊन लग्न करायला सांगितलं होतं. पण पुढे काय झालं ते देव जाणे. ती पतंग कोणी उडवली हेही माहिती नाही. खरं सांगायचं तर ती आजही हवेतच लटकलेली आहे"
advertisement
5/10
सुरेश वाडकर पुढे म्हणाले, "हा कार्यक्रम माधुरीही पाहणार आहे. जर ती माझ्यासमोर आली तर मला चांगलंच मारेल". वाडकरांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.
advertisement
6/10
ते पुढे म्हणाले, "जर माधुरीचं लग्न माझ्याशी झालं असतं तर आज ती माझ्यासोबत नसती का?" या ओळीवर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
advertisement
7/10
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळेस सुरेश वाडकर यांनी माधुरीच्या दिसण्यावरून तिला लग्नासाठी नकार दिला होता.  माधुरी दिसायला खूप बारीक आहे असं त्यांनी सांगितलं होतं.  सुरेश वाडकर माधुरीपेक्षा 11 वर्षांनी मोठे होते. पण या चर्चांवर माधुरी दीक्षित किंवा सुरेश वाडकर यांच्यापैकी कोणीही वक्तव्य केलेलं नाही. 
advertisement
8/10
माधुरी दीक्षित 1980 - 90 चा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. त्यानंतर 1999 साली तिने अमेरिकन Cardiovascular surgeon सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
advertisement
9/10
लग्नानंतरही माधुरी दीक्षितने तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे. लग्नानंतर, तिने 'लज्जा', 'हम तुम्हारे हैं सनम', 'आजा नचले', 'गुलाब गँग' आणि 'देढ इश्किया' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची क्राइम थ्रिलर मालिका 'मिसेस देशपांडे' ही सीरिज रिलीज झाली आहे. 
advertisement
10/10
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना अरिन आणि रायन नेने हे दोन मुलगे आहेत. माधुरी तिच्या मुलांसोबत वेळ घालवते आणि अनेकदा त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हो, माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी केलेली', मग का जुळले नाहीत सूर? पहिल्यांदाच बोलले सुरेश वाडकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल