TRENDING:

शनीची वक्री चाल! आता या 4 राशींची खरी परीक्षा सुरू होणार

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल देणारा शनि जेव्हा वक्री म्हणजेच उलट दिशेने चालतो, तेव्हा तो काही राशींवर प्रतिकूल तर काहींवर लाभदायक परिणाम करतो.
advertisement
1/6
शनीची वक्री चाल! आता या 4 राशींच्या लोकांची खरी परीक्षा सुरू होणार
ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल देणारा शनि जेव्हा वक्री म्हणजेच उलट दिशेने चालतो, तेव्हा तो काही राशींवर प्रतिकूल तर काहींवर लाभदायक परिणाम करतो. 13 जुलै 2025 पासून शनि मीन राशीत वक्री होणार असून हा प्रभाव तब्बल 139 दिवस राहणार आहे. 4 राशींवर त्याचा परिणाम होणार आहे.
advertisement
2/6
मेष - शनी बाराव्या घरात वक्री होत असल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी वाद घालण्याचे टाळा. आर्थिक नियोजनाअभावी त्रास संभवतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
advertisement
3/6
वृषभ - शनि अकराव्या घरात वक्री होणार आहे. सामाजिक वर्तुळात मतभेद संभवतात. मित्रांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. आर्थिक व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन गुंतवणूक टाळावी. सामाजिक प्रतिष्ठा घसरण्याचा धोका संभवतो.
advertisement
4/6
मिथुन -   शनी दहाव्या घरात वक्री होणार आहे. करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. संयमाने निर्णय घेणे गरजेचे आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर काही काळ वाट पाहावी.
advertisement
5/6
कर्क - शनि नवव्या घरात वक्री होत असल्याने उच्च शिक्षण, प्रवास आणि धार्मिक कार्यात संधी निर्माण होतील. व्यापारी वर्गासाठी प्रवास लाभदायक ठरेल. पूर्वीची अडचण कमी होण्यास मदत होईल. नवीन संधी मिळू शकतात.
advertisement
6/6
शनीच्या वक्रीचा एकूण परिणाम -  या वक्री गतीच्या काळात कर्म, न्याय आणि जबाबदारीवर विशेष भर राहणार आहे. काही राशींना नवीन शिकवण, तर काहींना नव्या संधी मिळू शकतात. मात्र, सर्वांनीच संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शनीची वक्री चाल! आता या 4 राशींची खरी परीक्षा सुरू होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल