TRENDING:

संघर्ष संपला, योग्य वेळ आली! डिसेंबरचा शेवटचा आठवडा 6 राशींसाठी ठरणार गेमचेंजर

Last Updated:
Weekly Horoscope :  डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होत असून 22 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी महत्त्वपूर्ण बदल घेऊन येणार आहे.
advertisement
1/7
संघर्ष संपला, योग्य वेळ आली! डिसेंबरचा शेवटचा आठवडा 6 राशींसाठी ठरणार गेमचेंजर
डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होत असून 22 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी महत्त्वपूर्ण बदल घेऊन येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात काही प्रमुख ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून त्याचा परिणाम थेट व्यक्तींच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य तसेच कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांवर जाणवणार आहे. काही राशींना संधी आणि प्रगतीचे संकेत मिळतील, तर काहींना संयम आणि सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जाणून घेऊया 12 राशींपैकी पहिल्या पाच राशींसाठी हा आठवडा कसा राहील.
advertisement
2/7
मेष रास -  मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ लाभदायक ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत, त्यामुळे आर्थिक स्थैर्य येईल. कौटुंबिक पातळीवर आनंददायी बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील.
advertisement
3/7
वृषभ रास -  वृषभ राशीसाठी हा आठवडा मिश्र फळ देणारा ठरणार आहे. कामाच्या व्यापामुळे धावपळ वाढेल आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवनात मात्र सुखद वातावरण राहील. नातेवाईक किंवा पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात गजबजलेले आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले मतभेद कमी होतील.
advertisement
4/7
मिथुन रास -  मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा अस्थिर ठरू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होत असली तरी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जुन्या वादांचा पुन्हा उफाळा येण्याची शक्यता असल्याने संयम बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्दांची काळजी घ्या. जोडीदार आणि मुलांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे समजूतदारपणा दाखवणे हितावह ठरेल.
advertisement
5/7
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सावध राहण्याचा इशारा देणारा आहे. बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असून त्यामुळे तणाव वाढू शकतो. कौटुंबिक पातळीवरही काही मतभेद उद्भवू शकतात, ज्यामुळे मानसिक चिंता वाढेल. शांतपणे परिस्थिती हाताळल्यास नुकसान टाळता येईल.
advertisement
6/7
सिंह रास -  सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आणि आनंददायी ठरणार आहे. नवीन योजना आखण्यासाठी आणि त्या अमलात आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा वैयक्तिक किंवा व्यावसायिक उपक्रम सुरू करता येईल. घरात शुभकार्य किंवा आनंदाची घटना घडू शकते. कुटुंबासोबत सहलीचा किंवा बाहेर फिरण्याचा योगही संभवतो.
advertisement
7/7
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
संघर्ष संपला, योग्य वेळ आली! डिसेंबरचा शेवटचा आठवडा 6 राशींसाठी ठरणार गेमचेंजर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल