शादी तो मैंने की है..! अमिताभसोबत जोडलं नाव, मुकेश अग्रवालसोबत संसार; 71 व्या वर्षी रेखानं कोणाशी केलं लग्न?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री रेखा यांचं नाव अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं. आता वयाच्या 71 व्या वर्षी रेखा यांनी कोणाशी लग्न केलं?
advertisement
1/9

अभिनेत्री रेखा बॉलिवूडची एव्हरग्नीन अभिनेत्री आहे. रेखा यांचं ऑनस्क्रिन आयुष्य नेहमीच यशाच्या शिखरावर राहिलं पण वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना त्यांना करावा लागला.
advertisement
2/9
रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामागचं सत्य आजवर कधीच समोर आलेलं नाही. मग ते रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा असोत किंवा रेखाचं भांगात कुंकू लावणं असो.
advertisement
3/9
आजही आपल्या सौंदर्या रेखा चाहत्यांना खिळवून ठेवतात. नुकत्याच एका कार्यक्रमात रेखा यांनी त्यांनी लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे. 71 व्या वर्षी यांनी कोणाशी लग्न केलंय?
advertisement
4/9
रेखा यांनी अभिनेत्री महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांच्या 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी रेखा यांनी महिमा चौधरीसोबत फोटोंसाठी पोझेस दिल्या. पॅप्ससोबत गप्पा देखील मारल्य. दरम्यान पॅप्ससमोर रेखा असं काही बोलून गेल्या की त्यांचे ते स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे.
advertisement
5/9
'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'च्या स्क्रिनिंगसाठी रेखा यांनी व्हाइट कलरचा सूट आणि प्रिंटेट दुपट्टा वेअर केला होता. ब्लॅक गॉगल्स, रेड लिप्स्टिक आणि भांगात सिंदूर फ्लाँट करताना दिसल्या.
advertisement
6/9
यावेळी महिमा चौधरी म्हणाली, दुसरं लग्न केलं तर... त्यावर रेखा म्हणाल्या, "लग्न पहिलं असो किंवा दुसरं, लग्न तर मी केलं आहे आयुष्याशी." रेखा यांच्या या स्टेटमेन्ट महिला म्हणजे "वॉव, असंच असलं पाहिजे." त्यावर रेखा म्हणतात, "लग्न हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. प्रेम आहे तर लग्न आहे, लग्न आहे तर प्रेम आहे."
advertisement
7/9
रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास रेखा यांचं नाव अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जोडण्यात आलं होतं. दोघांचं अफेअर होतं अशा अनेक चर्चा अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहेत.
advertisement
8/9
रेखाचं लग्न दिल्लीचा बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं झालं. त्यांचा संसार फक्त एक वर्ष टिकला. मुकेश यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर रेखानं पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रेखा सिंगल आयुष्य जगत आहेत.
advertisement
9/9
रेखा नेहमी सिंदूर लावून दिसतात. रेखा सिंदूर का लावतात हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. असं म्हणतात की सिंदूर लावणं ही त्यांची स्टाइल स्टेटमेन्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शादी तो मैंने की है..! अमिताभसोबत जोडलं नाव, मुकेश अग्रवालसोबत संसार; 71 व्या वर्षी रेखानं कोणाशी केलं लग्न?