TRENDING:

2026 Horoscope: 1, 10, 19, 28 जन्मतारखा असणाऱ्यांना वर्ष 2026 कसं असेल? करिअर, प्रॉपर्टी, लव्हलाइफ

Last Updated:
Mulank 1 2026 Horoscope: डिसेंबर महिना सुरू झाला की सर्वांनाच नवीन वर्षाचे वेध लागतात. राशीनुसार किंवा मूलांकावरून नवीन वर्ष कसं असेल याचा ज्योतिषशास्त्राद्वारे अंदाज घेता येतो. अंकशास्त्राद्वारे नवी वर्ष 2026 कसं असेल याची माहिती आम्ही तुम्हाला सांगू. आज आपण मूलांक 1 विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 या तारखांना जन्म झालेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. नवीन वर्षात या लोकांचे करिअर कसे असेल? पैसा, संपत्ती आणि उत्पन्न कसे राहील? नवीन वर्षात त्यांचे प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवन कसे असेल? नवीन वर्षाबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे प्रश्न असू शकतात. आज आपण अंकशास्त्रानुसार मूलांक 1 चा वार्षिक आढावा घेऊया.
advertisement
1/7
1 10 19 28 जन्मतारखा असणाऱ्यांना वर्ष 2026 कसं असेल? करिअर, प्रॉपर्टी, लव्हलाइफ
पंचागानुसार, ग्रहांचे मंत्रिमंडळ ठरले असून सूर्यच या वर्षाचा राजा असणार आहे. अंकशास्त्रात, मूलांक 1 चा अधिपती ग्रह सूर्य असून तो शासन, शक्ती, करिअर, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि वडिलांशी असलेले नाते इत्यादींचा कारक मानला जातो.
advertisement
2/7
मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल?नवीन वर्ष सूर्याचे वर्ष आहे आणि तुमचा अधिपती ग्रह सूर्यच आहे, त्यामुळे या वर्षी तुमचे व्यक्तिमत्व चांगलेच फुलेल. लोक तुमच्या कामाने, वागण्याने आणि बोलण्याने खूप प्रभावित होऊ शकतात. मूलांक 1 असलेल्या महिलांसाठी 2026 हे वर्ष खूप चांगले राहील.
advertisement
3/7
नवीन वर्षात स्ट्रेस फ्री राहील. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये तुम्हाला ज्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते, त्या पूर्वीसारख्या राहणार नाहीत. तुम्ही योग, ध्यान इत्यादींद्वारे तुमचे मन बळकट आणि शांत करू शकता.
advertisement
4/7
करिअर - या वर्षात तुम्हाला विशेषतः मित्रांकडून पाठिंबा मिळेल. भागीदारीत नवीन उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन वर्ष खूप चांगले असेल. भागीदारीतील काम तुमचा व्यवसाय किंवा करिअर नवीन उंचीवर नेणारे ठरेल. पण हाती घेतलेल्या कोणत्याही योजना पूर्णपणे अंमलात आणल्या पाहिजेत, तरच तुम्हाला पूर्ण परिणाम मिळतील. तुम्ही ज्या जोडीदारासोबत भागीदारी करत आहात त्याचा नीट अभ्यास करून पुढे जा.
advertisement
5/7
सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा सरकारी कामात असलेल्यांसाठी गे वर्ष चांगले जाईल. सरकारकडून लाभ अपेक्षित आहेत. सूर्याच्या स्थितीमुळे सरकार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. शिक्षण आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश मिळेल.
advertisement
6/7
जे लोक बऱ्याच काळापासून आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना 2026 वर्ष अनुकूल असेल. नवीन वर्षात तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकता. नवीन वर्षात मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे भविष्यात नफा मिळेल. जमीन, घरे, दुकाने, फ्लॅट इत्यादींमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नवीन वर्षात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
प्रेमजीवन - नवीन वर्ष नातेसंबंधांमध्ये गोडवा आणेल. जोडीदाराशी मतभेद झाले असले तरी आता सगळं रुळावर परत येईल. जोडीदारासोबतचे नाते राहण्यासाठी पुढाकार घ्या. हे वर्ष नातेसंबंध दुरुस्त करण्याची आणि जोपासण्याची संधी घेऊन येत आहे. जे अजूनही अविवाहित आहेत त्यांना चांगला जोडीदार मिळू शकतो. तुमचे दिवस रोमँटिक राहणार आहेत. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
2026 Horoscope: 1, 10, 19, 28 जन्मतारखा असणाऱ्यांना वर्ष 2026 कसं असेल? करिअर, प्रॉपर्टी, लव्हलाइफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल