TRENDING:

आज ८ ऑक्टोबरपासून या राशींचे मंगळ करणार 'मंगल', बक्कळ पैसा मिळणार

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, ऊर्जा आणि भूमीचा अधिपती मानले जाते. मंगळ शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला यश, कीर्ती आणि नेतृत्व मिळते.
advertisement
1/5
आज ८ ऑक्टोबरपासून या राशींचे मंगळ करणार 'मंगल', बक्कळ पैसा मिळणार
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, ऊर्जा आणि भूमीचा अधिपती मानले जाते. मंगळ शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला यश, कीर्ती आणि नेतृत्व मिळते. तो व्यक्ती धैर्याने प्रत्येक आव्हानाला सामोरे जातो. मात्र, जेव्हा मंगळ ग्रह राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो. सध्या मंगळ तूळ राशीत असून स्वाती नक्षत्रामध्ये भ्रमण करत आहे, आणि त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे.
advertisement
2/5
पंचांगानुसार, मंगळ ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी स्वाती नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करेल. राहू या नक्षत्राचा स्वामी असल्यामुळे मंगळाच्या ऊर्जेला काही प्रमाणात गूढता आणि अनपेक्षित बदल मिळतील. मंगळ १३ ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहील. या कालावधीत काही राशींच्या व्यक्तींना मोठे यश, आर्थिक लाभ आणि आत्मविश्वासात वाढ अनुभवायला मिळेल.
advertisement
3/5
<strong>मेष -</strong>   मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह असल्याने या राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवे करार होतील. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील, तर विवाहित जीवनात समाधान आणि आनंद वाढेल.
advertisement
4/5
<strong>सिंह -   </strong>सिंह राशीसाठी मंगळाचा स्वाती नक्षत्रातील गोचर अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात आत्मविश्वासात वाढ होईल आणि मानसिक ताण दूर होईल. नोकरीत प्रगती होईल, तसेच मान-सन्मान मिळेल. सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल. कुटुंबात आनंददायक घडामोडी घडतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिरता आणि प्रगती देणारा असेल. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.
advertisement
5/5
<strong>धनु - </strong>  धनु राशीसाठी मंगळाचे हे नक्षत्र गोचर अत्यंत शुभ संकेत देणारे आहे. पूर्वी अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरीत बढती किंवा नवे जबाबदाऱ्या येऊ शकतात. व्यवसायिकांसाठीही नवे करार आणि विस्ताराची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य वाढेल. प्रवासाचे योग निर्माण होतील आणि नवीन अनुभव मिळतील. आरोग्य उत्तम राहील आणि आत्मविश्वास वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज ८ ऑक्टोबरपासून या राशींचे मंगळ करणार 'मंगल', बक्कळ पैसा मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल