Madhuri Dixit Duplicate: माधुरी दीक्षितची डुब्लीकेट, 5 वर्षात केले 17 सिनेमे; विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात करिअर टाकलं धोक्यात
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhuri Dixit Duplicate : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री झळकली जिने तिच्या गोड हास्याने आणि आकर्षक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ती अगदी माधुरी दीक्षितसारखी दिसायची.
advertisement
1/7

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री झळकली जिने तिच्या गोड हास्याने आणि आकर्षक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ती अगदी माधुरी दीक्षितसारखी दिसायची. त्यामुळे तिला माधुरीची डुब्लीकेट अशीच ओळख मिळालेली.
advertisement
2/7
अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या चेहऱ्यावरील माधुरी दीक्षितसारख्या लुकमुळे लोक तिला "छोटी माधुरी" म्हणू लागले. तिची लोकप्रियता वाढत होती मात्र तिनं क्रिकेटरच्या प्रेमात करिअर सोडलं.
advertisement
3/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री आहे, फरहीन खान. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘जान तेरे नाम’ या सुपरहिट चित्रपटातून फरहीनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रोनित रॉयसोबतच्या तिच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
advertisement
4/7
या चित्रपटानंतर फरहीन एकाच रात्रीत स्टार बनली. तिचं सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या सर्व गुणांमुळे ती निर्मात्यांची पहिली पसंती ठरू लागली. पाच वर्षांच्या कालावधीत फरहीनने सुमारे 17 चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/7
फरहीन ती ‘सैनिक’, ‘धारण’, ‘नसीबवाला’ यांसारख्या चित्रपटांत दिसली. पण करिअरच्या शिखरावर असतानाच फरहीनने अचानक फिल्म इंडस्ट्री सोडली. लग्न केलं अन् इंडस्ट्रीला रामराम केला.
advertisement
6/7
फरहीन भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकरच्या प्रेमात पडली. मनोज त्या वेळी विवाहित होते आणि त्यांना एक मूलही होतं. तरीही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1994 साली फरहीन आणि मनोज प्रभाकर विवाहबंधनात अडकले. काही अहवालांनुसार लग्नाआधीच फरहीन गर्भवती होती.
advertisement
7/7
लग्नानंतर फरहीन पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. सध्या ती पती मनोज प्रभाकरसोबत दिल्लीमध्ये राहते आणि स्वतःचा व्यवसाय चालवते. ‘बाजीगर’ चित्रपटातील भूमिका सुरुवातीला फरहीनला ऑफर करण्यात आली होती, पण तिने ती नाकारली. नंतर ती भूमिका शिल्पा शेट्टीला मिळाली आणि ती एका रात्रीत स्टार बनली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit Duplicate: माधुरी दीक्षितची डुब्लीकेट, 5 वर्षात केले 17 सिनेमे; विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात करिअर टाकलं धोक्यात