TRENDING:

मालिकेतून काढलं अन् 'ती'च्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता सुबोध भावे, सांगितला तो किस्सा

Last Updated:
अभिनेता सुबोध भावेनं त्याच्या पहिल्या रिजेक्शनचा किस्सा सांगितला. रिजेक्शनचा दु:ख तो पचवू शकला नव्हता.
advertisement
1/7
मालिकेतून काढलं अन् 'ती'च्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता सुबोध भावे
अभिनेता सुबोध भावे सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतोय. त्याचा सकाळ तर होऊ द्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
2/7
आज यशाच्या शिखरावर असलेल्या सुबोधलाही सुरुवातीच्या काळात अनेक नकार पचवावे लागले. अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या रिजेक्शनचा किस्सा सांगितला.
advertisement
3/7
वायफळला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुबोध म्हणाला, "सुरुवातीच्या काळात मला एका मालिकेची ऑफर आली होती. मी तेव्हा 25 वर्षांचा होता. ती मालिका जास्त बजेटवाली आणि मोठ्या वाहिनीवर दिसणार होती."
advertisement
4/7
"मालिकेत मला मुख्य भूमिकेत होती. पण ऐन वेळेस मला सांगण्यात आलं की मी त्या भूमिकेसाठी मोठा वाटतो त्यामुळे मला नकार देण्यात आला. मला तेव्हा खूप दु:ख झालं होतं."
advertisement
5/7
सुबोध पुढे म्हणाला, "त्याचवेळी माझी स्मिता तळवळकर आणि संजय सूरकर यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी मी सिनेमात काम करत होतो. मालिकेतून काढल्यानंतर मी स्मिता मावशींच्या ऑफिसमध्ये गेलो. एका कोपऱ्यात बसतो आणि चेहरा पडलेला होता."
advertisement
6/7
"स्मिता मावशीने मला पाहिलं आणि बोलावलं. मला विचारलं काय झालं. मी तिला रडत रडत सांगितलं की मला मालिकेतून काढलं."
advertisement
7/7
"तिने माझ्या डोक्यावर असा हात फिरवला. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. स्मिता मावशी मला म्हणाली, ही तुझी स्मिता मावशी जिवंत आहे ना तोपर्यंत तू कधी उपाशी बसणार नाही. चल माझ्याबरोबर मला मालिकेची स्क्रिप्ट शोधायला मदत कर."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मालिकेतून काढलं अन् 'ती'च्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता सुबोध भावे, सांगितला तो किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल