कफ सीरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या इंदूरमधील औषध कंपनी एआरसी फार्मास्युटिकल्स संशयाच्या भोवऱ्यात आली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार केंद्र आणि राज्य पथकांनी कंपनीची केली आणि 89 पानांचा अहवाल दिला. यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालात 216 त्रुटींची यादी देण्यात आली आहे, त्यापैकी 23 गंभीर आहेत.
advertisement
Cough Syrup : कफ सिरफ नाही मग खोकला झाल्यावर मुलांना काय द्यायचं? डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सिरप बुरशीजन्य पाण्यापासून बनवलं गेलं होतं, घाणेरड्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये साठवलं गेलं होतं. तपास पथकाला औषध कंपनीत एक घाणेरडा निळा ड्रम सापडला, ज्यामध्ये 50-60 लिटर सिरप सस्पेन्शन होतं. गॅस स्टोव्हवर साखरेचा पाक तयार केला जात होता, जो नियमांच्या विरुद्ध आहे. कंपनीकडे डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण तपासण्याची प्रक्रिया नव्हती.
एआरसीचं सिरप, डीफ्रॉस्ट छिंदवाडा येथील एका फार्मसीमधून जप्त केले. नंतर सिरपचं उत्पादन थांबवलं. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार हरियाणाचे माजी राज्य औषध नियंत्रक नरेंद्र आहूजा यांनी सांगितलं की जर एखाद्या औषध निर्मिती कारखान्यात 216 दोष आहेत, ज्यापैकी 23 अतिशय गंभीर आणि 150 पेक्षा जास्त गंभीर आहेत. तर दोष दुरुस्त होईपर्यंत कंपनीला औषध तयार करण्याची परवानगी देऊ नये.जर बुरशीजन्य पाण्याचा वापर होत असेल, तर औषध निश्चितच खराब होईल.
Health Risk Of The Day : चहा नाही तुम्ही विष पिताय, तज्ज्ञांनी सांगितले भयंकर दुष्परिणाम
कफ सिरपबाबत सरकारच्या सूचना
1) 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत.
2) 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
3) कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे.
4) औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधं द्यावीत.
5) डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.