Health Risk Of The Day : चहा नाही तुम्ही विष पिताय, तज्ज्ञांनी सांगितले भयंकर दुष्परिणाम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Health Risk Of The Day : तुम्ही चहा नाही विष पित आहात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चहाचं व्यसन हे दारूच्या व्यसनापेक्षाही वाईट असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. पण तज्ज्ञ असं का म्हणाले पाहुयात.
नवी दिल्ली : चहा म्हणजे बहुतेक भारतीयांच्या दिवसांची सुरुवात, काहींच्या तर दिवसाचा शेवटही. कित्येकांचा दिवसभर लागतो. चहा कितीही चांगला वाटत असला तरी त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. तुम्ही चहा नाही विष पित आहात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चहाचं व्यसन हे दारूच्या व्यसनापेक्षाही वाईट असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. पण तज्ज्ञ असं का म्हणाले पाहुयात.
तज्ज्ञांच्या मते जास्त चहा प्यायल्याने शरीरातील लोहाचे शोषण कमी होते. लोहाची कमतरता ही जगभरातील सर्वात जास्त पोषक तत्वांची कमतरता आहे आणि जर तुमच्याकडे लोहाची पातळी कमी असेल तर जास्त चहा प्यायल्याने तुमची समस्या वाढू शकते.
advertisement
चहामध्ये कॅफिन नैसर्गिकरित्या आढळते. चहा किंवा इतर कोणत्याही स्रोतातील कॅफिन जास्त प्रमाणात घेतल्यास चिंता, तणाव आणि अस्वस्थता वाढू शकते. चहामध्ये कॅफीन असल्याने, जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या झोपेच्या पद्धतीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. मेलाटोनिन हे एक हॉर्मोन आहे, जे मेंदूला झोपेची वेळ आली आहे याची जाणीव करून देतो. कॅफिन मेलाटोनिन दडपून टाकू शकते, परिणामी झोपेची गुणवत्ता खराब होते.
advertisement
चहातील कॅफीनमुळे छातीत जळजळ होऊ शकते किंवा आधीच असलेले ऍसिड रिफ्लक्स बिघडू शकतात. चहाचे काही घटक मळमळ निर्माण करू शकतात, विशेषत: जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास हा त्रास अधिक होऊ शकतो. गरोदरपणात चहा सारख्या द्रवपदार्थातून कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर बाळाचे वजन कमी होण्याचाही धोका वाढू शकतो.
advertisement
तज्ज्ञांनी चहाला म्हटलं विष
होमिओपॅथी डॉ. ज्योती यांनी एका पॉडकास्टवर चहाचे धोके सांगितले आहेत. चहाला विष म्हणत ते कसं विष आहे तेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
डॉ. ज्योती म्हणाल्या, चहा आपल्यासाठी बिलकुल चांगला नाही. आपण त्याला पूर्ण विषच बनवून टाकलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे चहाला चांगली टेस्ट येण्यासाठी अॅल्युमिनिअमचं जे भांडं वापरलं जातं ते सगळ्यात चुकीचं. दुसरं म्हणजे बहुतेक महिला चहापावडर टाकून चहा 15-15 मिनिटं उकळवतात जेणेकरून त्याला टेस्ट यावी, चहा घट्ट व्हावा हे पण चुकीचं आहे. हे विषारी आहे. त्यानंतर त्यात दूध टाकतात. दूध पूर्ण बंद करा. आईचं दूध सोडून दुसरं दूध घेऊच नये. साखर हासुद्धा असा पदार्थ आहे जो आपण खाल्ला नाही पाहिजे. या तिन्ही विषजन्य घटकातून बनतो तो चहा. दारूपेक्षाही वाईट व्यसन आहे चहा.
Location :
Delhi
First Published :
October 07, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : चहा नाही तुम्ही विष पिताय, तज्ज्ञांनी सांगितले भयंकर दुष्परिणाम