Mumbai Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, भरधाव एर्टीगा कार 30 फुटांवरून थेट समुद्रात कोसळली
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Coastal Road Accident :कोस्टल रोडवर भीषण अपघात, भरधाव एर्टीगा कार 30 फुटांवरून थेट समुद्रात कोसळली
मुंबई: मागील काही दिवसांपासून कोस्टल रोडवर वेगवेगळ्या कारणांनी अपघात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडवरील भुयारी मार्गात एका कारला आग लागल्याची घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एर्टिगा कार थेट समुद्रात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. वरळी येथे हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला वाचवले.
मुंबईच्या कोस्टल रोडवर सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. एर्टिगा प्रकारची कार नियंत्रण सुटल्याने वरळी कोस्टल रोडवरील डिवायडर तोडून तब्बल 30 फूट खोल समुद्रात कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा झाला?
एर्टिगा कार ही महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. कारने भरधाव वेगात डिवायडरला धडक दिली आणि थेट समुद्रात कोसळली. अपघात झाल्याचे समोर येताच गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत चालकाचा जीव वाचवला.
advertisement
अपघातातील चालकाचे नाव फ्रशोगर दरायुश बत्तीवाला (वय 28) असून त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक किरकोळ जखमा झाला असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वरळी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कोस्टल रोडवर वेग मर्यादेचे उल्लंघन...
advertisement
दरम्यान, समुद्रात बुडालेली कार अजूनही बाहेर काढली गेलेली नाही. या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहन चालकांकडून होत असलेल्या वेग मर्यादेच्या उल्लंघनाचा मुद्या पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कोस्टल रोडवर वाहन चालकांकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. कोस्टल रोडवर अनेक ठिकाणी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, भरधाव एर्टीगा कार 30 फुटांवरून थेट समुद्रात कोसळली