IND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कांगारूंनी थेट कॅप्टन बदलला! शुभमनविरुद्ध 15 खेळाडूंची घोषणा, पाहा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Australia : दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेलला मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे टी-ट्वेंटी सीरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. विकेटकीपर एलेक्स कॅरी पहिली मॅच खेळू शकणार नाही.
Australian Team ODI and T20 squads announced : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन वनडे आणि पाच मॅचच्या T20 सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची (IND vs AUS) घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही सीरीजमध्ये मिचेल मार्श संघाचे कर्णधार असेल. मात्र, T20 टीम फक्त पहिल्या दोन मॅचसाठीच जाहीर करण्यात आली आहे. भारतीय टीमचा स्क्वॉड 4 ऑक्टोबरला बीसीसीआयने जाहीर केला होता. ऑस्ट्रेलियाई निवड समितीने दुखापतीतून सावरत असलेल्या पॅट कमिन्सला आराम दिला आहे. तर काही खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.
दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल बाहेर
आरोन हार्डी, मॅथ्यू कुह्नमैन आणि मार्नस लाबुशेन यांना टीममधून वगळण्यात आलं आहे. तर दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेलला मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे टी-ट्वेंटी सीरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. विकेटकीपर एलेक्स कैरी पहिली मॅच खेळू शकणार नाही, कारण तो त्यावेळी शेफील्ड शील्ड मॅच खेळत असेल. निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले की, T20 टीमची निवड आगामी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी करण्यात आली आहे, परंतु काही खेळाडूंना आगामी एशेज टेस्ट सीरीजसाठी शेफील्ड शील्डमध्ये खेळायचे आहे. त्यामुळे कॅमरून ग्रीनला T20 टीममध्ये सामील केलं नाही.
advertisement
दोन खेळाडूंची एन्ट्री
मॅथ्यू रेनशॉ आणि मिचेल ओवेन या दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या 2027 वन-डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मिडल ऑर्डरला बळकटी देण्यासाठी टीममध्ये आणलं गेलं आहे. मॅथ्यू रेनशॉने देशांतर्गत 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो स्टीव स्मिथ आणि लाबुशेनप्रमाणे इनिंग सांभाळण्याची भूमिका बजावू शकतो. मिचेल ओवेन त्याच्या स्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो. त्याने मागील सीजनमध्ये 48 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. तो मॅक्सवेल आणि स्टोइनिसप्रमाणे फिनिशिंगची भूमिका पार पाडू शकतो.
advertisement
Introducing our Australian Men's squads for the ODI & T20I series against India pic.twitter.com/6pSGjzUL01
— Cricket Australia (@CricketAus) October 7, 2025
टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वनडे स्कॉड -
मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, एलेक्स कैरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, ॲडम जम्पा.
advertisement
टी-ट्वेंटीसाठी ऑस्ट्रेलियाचा स्कॉड -
मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम जम्पा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 8:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कांगारूंनी थेट कॅप्टन बदलला! शुभमनविरुद्ध 15 खेळाडूंची घोषणा, पाहा कोण?