TRENDING:

Aajache Rashibhavishy: भविष्याची चिंता सोडा, आज गुड न्यूज मिळणार, नशीब पालटणार, मेष ते मीन राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे तुमच्या रोजच्या घडामोडींचे अंदाज देत असते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
भविष्याची चिंता सोडा, आज गुड न्यूज मिळणार, नशीब पालटणार, मेष ते मीन राशीभविष्य
मेष- नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मुखातून आनंद वार्ता ऐकणार आहात. आज तुमचा शुभ अंक हा 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ -यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. आज तुम्हाला तुमचा जोडीदार आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. शुभ अंक 1 आणि शुभ रंग नारंगी असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन- आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. आज साठी तुमचा शुभ अंक हा 4 असणार आहे तर रंग चॉकलेटी किंवा करडा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क - जीवनाच्या वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून आज पासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. अन्यथा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकतात. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा अथवा तुम्हाला आपला दिवस संपूर्ण खराब झाल्याचे वाटेल. तर आज तुमचा शुभ रंग हा काळा आणि निळा असणार तसेच शुभ अंक हा 8 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज तुमची साथ देईल. हुशारीने गुंतवणूक करा लाभ नक्की जाणवेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही राजी व्हाल. आज तुमच्या साठी 6 हा अंक शुभ तर रंग हा गुलाबी शुभ असणार आहे.
advertisement
6/13
कन्या - नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे आज टाळले तर बरे याने वाद मिटतील. कुणाशीही डोकं शांत ठेवून आणि विचारपूर्वक बोलणे आज फायदेशीर ठरणार आहे. तसेच आज तुमच्यासाठी शुभ अंक हा 4 असणार आहे तर रंग चॉकलेटी फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
7/13
तूळ - या राशीच्या लोकांना डोळ्या बाबतची समस्या उद्भवू शकते. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. प्रवासाचे संकेत आहेत. तसेच आज तुमचा शुभ रंग हा पांढरा आणि अंक 7 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक - तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. आज जवळील व्यक्ती कडून भेटवस्तू मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमचा शुभ रंग लाल आणि अंक 9 असणार आहे.
advertisement
9/13
धनु - आज तुमच्या सोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्या करता आज कोणासोबत जास्तीचे बोलणे टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. जवळील व्यक्ती आज तुमच्या पासून दुखावू शकतात. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. आज तुमच्यासाठी 6 हा अंक लाभ देणार असणार आहे. तर गुलाबी हा रंग परिधान केल्याने कामे मार्गी लागतील.
advertisement
10/13
मकर - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्यासाठी शुभ रंग हा गुलाबी असणार आहे तर शुभ अंक 6 असणार.
advertisement
11/13
कुंभ- तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुमचा शुभ अंक 8 असणार आहे आणि रंग काळा हा लाभ देणार असणारा आहे.
advertisement
12/13
मीन- आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आजचा दिवस रिकामा व्यर्थ घालू नका. आज तुमचा शुभ रंग हा नारंगी आणि अंक हा 1 आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishy: भविष्याची चिंता सोडा, आज गुड न्यूज मिळणार, नशीब पालटणार, मेष ते मीन राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल