TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसे जपून वापरा, मित्रच देऊ शकतात धोका, तुमच्या नशिबात काय? पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: प्रत्येक दिवस सर्वांच्या जीवनात एक नवीन सुरुवात घेऊन येतो. त्यामुळे तुमच्या जन्म नावावरून तुमच्या गोचरच्या राशींचे भाकीत आणि नक्षत्रावरून तुमचा आजचा दिवस कसा आहे? हे आजच्या दैनंदिन राशीभविष्यच्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
1/13
पैसे जपून वापरा, मित्रच देऊ शकतात धोका, तुमच्या नशिबात काय? पाहा आजचं राशीभविष्य
मेष राशी - कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी- तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जो आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. कामातील बदल तुम्हाला मन:शांती मिळवून देईल. तुमच्या आवडीची कामे आज पूर्ण होतील. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकवणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकतात. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कुठलेही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरे काम करू नका जर तुम्ही असे केले तर, तुम्हाला भविष्यात समस्या होऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. आज तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करू नका. आज तुम्ही आपल्या कुणी मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचाल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग निळा असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी - कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. अचानक प्रवासाचा योग होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आज तुमचा दिवस हा आनंदी आणि ऊर्जा देणारा असणार आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आर्थिक परिस्थितीमुळे काही समस्या या येऊ शकतात. हातात घेतलेली कामे आज पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. जिद्द सोडू नये. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. अविवाहितांसाठी आज चांगला संदेश मिळू शकतो. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - बाहेर फिरायला जाण्याचे अचानक योग हे येणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून, आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्याकडून तुम्हाला आर्थिक लाभ पुढे मिळणार आहे. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. आज तुमचा शुभ अंक 2 तर रंग पांढरा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसे जपून वापरा, मित्रच देऊ शकतात धोका, तुमच्या नशिबात काय? पाहा आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल