TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसा येणार की जाणार, तुमच्या नशिबात बुधवारी काय असणार? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा बुधवार खास असणार आहे. काही राशींना धनलाभ होणार असून काहींना पैशाचा जपून वापर करावा लागेल.
advertisement
1/13
पैसा येणार की जाणार, तुमच्या नशिबात बुधवारी काय असणार? आजचं राशीभविष्य
मेष राशी -तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी -व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी-विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी -आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी-घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा केल्याने भविष्यात अनेक अडथळे निर्माण होतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. जमिनी संदर्भातील कामाचा आज निर्णय होऊन तुम्ही आनंदी असणार. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा आहे.
advertisement
7/13
तुळ राशी-प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -तुमची जमीन किंवा वास्तू आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी -चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आज तुम्ही आपल्या लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्व ही देऊ शकता. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज तुमचा शुभ अंक 3 येणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी -आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळू शकते. अचानक येणाऱ्या आनंदामुळे आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी -आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे. आज प्रवास करणे टाळा. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण-तणावाचे मळभ असेल. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे आज बऱ्यापैकी मार्गी लागतील. यामुळे काहीसा दिलासा तुम्हाला आज मिळू शकतो आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा येणार की जाणार, तुमच्या नशिबात बुधवारी काय असणार? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल