TRENDING:

Aajache Rashibhavishya: टेन्शनचे दिवस संपले! शनिवारी नशिबाची पलटी, या राशींना हवं ते मिळणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: जानेवारी महिन्यातील शेवटचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल? याबाबत नाशिकचे ज्योतिषी समीर जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13
टेन्शनचे दिवस संपले! शनिवारी नशिबाची पलटी, हवं ते मिळणार, आजचं राशीभविष्य
मेष राशी -पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर, तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -ज्या लोकांनी आपला पैसा शेअर मार्केटमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. जमिनी संदर्भातील गोष्टी आज मार्गी लागतील. अचानक धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळेचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. हातात घेतलेले कामे मार्गी लागण्यासाठी आजचा दिवस शुभ. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हातात घ्यायला हवेत. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची तंदुरुस्ती आज तुमच्या कुटुंबातील लोकांना आनंद देईल. कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे - तुमच्या मनावर दबाव येईल. महत्त्वाच्या निर्णयाला शेवटचे रूप दिले जाऊ शकते. असे करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पुढे जाऊन हा निर्णय बराच लाभदायक सिद्ध होईल. आज तुमचा शुभ अंक 1 आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: टेन्शनचे दिवस संपले! शनिवारी नशिबाची पलटी, या राशींना हवं ते मिळणार, आजचं राशीभविष्य
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल