Aajache Rashibhavishya: कष्टाचे दिवस सरले, बुधवारी हवं ते मिळणार, पण ‘या’ चुका भोवणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस खास आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आर्थिक बाजूने चांगला असणार आहे. आज आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कुंभ राशीत असून लाभ स्थानात असल्यामुळे आजचा दिवस शुभ जाणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी सुद्धा आजचा दिवस चांगला असणार आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारे कामे आज पूर्ण होतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मान - सन्मान मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानात भ्रमण करतोय. त्याची शुभ दृष्टी तुमच्यावर होत आहे.
advertisement
3/13
मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. कामाचा अतिताण जाणवू शकतो. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यातील संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस धनलाभ घेऊन येत आहे. कर्क ही चंद्राची रास असून आज चंद्र दशम स्थानात असल्याने संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ना काही आनंदाची बातमी आज नक्की मिळेल. एकूणच आजचा दिवस समाधानकारक असणार आहे.
advertisement
5/13
आज भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे. त्यामुळे नवीन योजना सुरू करण्यासाठी सिंह राशीच्या व्यक्तीसाठी अगदी योग्य वेळ आहे. आज तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागा.
advertisement
6/13
कन्या राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस परोपकारात जाणार असून दिवसभरात तुम्ही अनेकांना मदत करणार आहात. मदत केल्याचं समाधान आज तुम्हाला मिळणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सोने पे सुहागा पद्धतीचा असणार आहे. आज तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सप्तम स्थानात आहे. त्यामुळे दिवस उत्तम जाणार आहे. फक्त निर्णय घेताना अति घाई टाळा.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कुंभ राशीत चतुर्थ स्थानात असून चंद्र पंचम स्थानात आहे. त्यामुळे तुम्हाला कामामध्ये प्रगती करण्याची चांगली संधी मिळणार आहे. तुमच्या हातून न कळत होणाऱ्या चुकाही तुमच्या लक्षात येतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
9/13
धनु राशीच्या व्यक्तीसाठी सुद्धा आज धनलाभाचा योग जुळून आला आहे. आज कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसा येईल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु मिथुन राशीत आहे आणि चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने अचानक लाभाची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती होईल.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामात केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला आनंद मिळेल.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार चांगला जाणार आहे. गुरु-राहू योग आणि चंद्राच्या प्रभावामुळे नशिबाची साथ मिळेल. कामात प्रगती होईल, पैशांची स्थिती सुधारेल आणि मान-सन्मानही वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल दिसू शकतात, पण ते तुमचाच फायदा करून देतील.
advertisement
12/13
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा बुधवार समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. काही इच्छांची पूर्तता होऊ शकते. मन शांत ठेवणे गरजेचं आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा वाढेल. गुरुच्या स्थितीमुळे सकारात्मक बदल जाणवतील.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: कष्टाचे दिवस सरले, बुधवारी हवं ते मिळणार, पण ‘या’ चुका भोवणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य