TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसा, नोकरी, विवाह अन् आरोग्य, तुमच्या राशीसाठी गुरुवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा गुरुवार नव्या संधी घेऊन येणार आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, विवाह, नोकरी यांसाठी तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा? जाणून घेऊ.
advertisement
1/13
पैसा, नोकरी अन् विवाह, तुमच्या राशीसाठी गुरुवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
मेष राशी -आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी -तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असेल.
advertisement
5/13
सिंह राशी-कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी -आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
7/13
तुल राशी-चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी -आजच्या दिवसात गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. आज तुमच्या हस्ते काही तरी चांगले काम होऊ शकते. या राशीतील काही विद्यार्थी आज आपल्या अभ्यासात प्रगती पथावर पोहोचतील. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी -निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा, स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे, वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल. हाताखालच्या सहकाऱ्यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. मध्यानंतर दिवस कुशल जाणारा. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही. जोडीदार आज आनंदाची बातमी तुमच्या कुटुंबाला देऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा, नोकरी, विवाह अन् आरोग्य, तुमच्या राशीसाठी गुरुवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल