Aajache Rashibhavishya: आर्थिक लाभ होणार, गुंतवणूक ठरेल फायद्याची, वाचा 30 जूनचं राशीभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Aajache Rashibhavishya: दैनिक राशीभविष्य हे आपल्या ग्रहांप्रमाणे आपले रोजचे भाग्य दर्शवत असते. आपल्या आजच्या दिवसात आपली राशी काय प्रगती करणार आहे. कोणती संकटे आपल्या अंगी येणार आहेत. तसेच कोणत्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळणार आहे हे आपल्याला आजच्या दैनिक राशीभविष्यातून पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/13

मेष राशी - भाऊ-बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ-बहिणींचा सल्ला घ्या. तुमचा जोडीदार काळजी घेईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. अचानक आनंदाची वार्ता कानी येईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. मुलांच्या यशस्वी झाल्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. अंगभूत गुण तुम्हाला समाधान देतील. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणा गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी-पेशात जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतील. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की, तुमची गरजेची कामेही सुटून जातील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत घालवतील. आजचा दिवस कामासाठी लाभ देणारा असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जर तुमची धन संबंधित काही चिंता असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. आज आपल्या कष्टांमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय आज तुमचा कुणीतरी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्याप्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या आयुष्यातील आजचा दिवस हा एक अविस्मरणीय दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. ज्या लोकांनी कुणा अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धनगुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आज तुम्ही चांगल्या पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - दुःखीकष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन केल्यामुळे उत्साह वाटेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कुणालाही राजी होईल असे वर्तन करणे आपल्याला कुठेतरी धोक्याचे ठरू शकते. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज तुम्हाला जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एखाद्या कामात मन लागत नसेल तर आज ते काम देखील पूर्ण होईल. कुठल्या कामात हात घालत आहात हा विचार करूनच पाऊल टाकणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज राहिलेली कामे पूर्ण करून घ्या. आजचा दिवस कामासाठी योग्य आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
13/13
टीप: हे राशीभविष्य सामान्य आहे आणि वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून परिणाम बदलू शकतात. अधिक अचूक भविष्यासाठी ज्योतिषीशी संपर्क साधा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: आर्थिक लाभ होणार, गुंतवणूक ठरेल फायद्याची, वाचा 30 जूनचं राशीभविष्य