TRENDING:

Shanidev uday 2024: 30 वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत करणार चमत्कार; या 3 राशींचे नशीब उजळणार

Last Updated:
Shanidev uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेव हे कर्मफळ दाता आणि न्यायदेवता मानले जातात. शनिदेव 30 वर्षांनंतर विशेष स्थितीतून दुसऱ्या ग्रहस्थितीत प्रवेश करणार आहेत. मार्चमध्ये शनिदेवाचा उदय होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. या स्थितीत 3 राशींना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार. त्यामुळे हे लोक करिअर आणि व्यवसायात असाध्य प्रगती करू शकतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
advertisement
1/6
30 वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत करणार चमत्कार; या 3 राशींचे नशीब उजळणार
कुंभ - शनिदेवाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण या राशीतच शनिदेवाचा उदय होईल. याशिवाय शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे शनिदेवाच्या आशीर्वादानं तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल.
advertisement
2/6
कुंभ - भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचा त्यांच्या भागीदारांशी चांगला ताळमेळ राहील आणि नफा मिळण्याचे शुभ संयोग घडतील. त्याचबरोबर शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे यावेळी तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. तुम्ही पैसेही वाचवू शकाल.
advertisement
3/6
सिंह - कुंभ राशीतील शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून सप्तम भावात उदयास येणार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. शत्रूंवरही तुमचा विजय होईल. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
advertisement
4/6
सिंह - या काळातील काही व्यावसायिक सौदे भविष्यात व्यापाऱ्यांना मोठा नफा देतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तसेच शनिदेवाने तुमच्या राशीतही शश राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.
advertisement
5/6
मेष - शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून 11व्या भावात उदयास येणार आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील.
advertisement
6/6
मेष - नोकरीतील लोकांना त्यांच्या अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीत गुंतवणूक करायची आहे ते करू शकतात. काळ अनुकूल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shanidev uday 2024: 30 वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत करणार चमत्कार; या 3 राशींचे नशीब उजळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल