Astrology: पायाच्या अंगठ्यापेक्षा दुसरं बोट लांब आहे? स्वभावात हे गुण-दोष हमखास असतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Personality According to Finger : ज्योतिषशास्त्राद्वारे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते. आपल्या सर्वांच्या पायाची किंवा हाताची बोटे साधारणपणे समान नसतात, परंतु त्यांचे वेगवेगळे आकार देखील त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगतात. आज आपण पायाच्या दुसऱ्या बोटाबद्दल (अंगठ्या शेजारच्या) बोलत आहोत.
advertisement
1/5

काहीजणांचे हे बोट अंगठ्यापेक्षाही लांबीला मोठे असते. आपल्यापैकी कोणाचे बोट असे असेल तर त्याविषयी आज जाणून घेऊ. त्याची रचना तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
advertisement
2/5
पायाच्या अंगठ्यापेक्षा जवळचे बोट लांब असण्याचा अर्थ -ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे वेगवेगळे अवयव कोणत्या ना कोणत्या राशीशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे, पाय मीन राशीशी संबंधित आहेत. मीन राशीचे लोक ज्यांच्या पायाचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असते ते खूप संवेदनशील असतात.
advertisement
3/5
बोट आणि मीन यांच्यातील संबंधांमुळे, अशा लोकांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती देखील जास्त असते. हे लोक बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत उत्तम क्षमता दाखवू शकतात आणि जीवनातील चढ-उतारांवर सहज मात करतात.
advertisement
4/5
हट्टी स्वभाव -ज्या लोकांचे पायाचे दुसरे बोट अंगठ्यापेक्षा लांब असते ते खूप हट्टी स्वभावाचे असतात. म्हणजे हे लोक आपला मुद्दा मांडण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात आणि यातून कधी कधी मोठी उंचीही गाठू शकतात.
advertisement
5/5
सर्जनशीलतेने समृद्ध -असेही मानले जाते की, ज्या लोकांच्या पायाचे दुसरे बोट अंगठ्यापेक्षा लांब असते ते खूप सर्जनशील असतात आणि त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या कल्पना फिरत राहतात. असे लोक लेखन, चित्रकला किंवा संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवतात. कारण असे लोक कल्पकही असतात.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: पायाच्या अंगठ्यापेक्षा दुसरं बोट लांब आहे? स्वभावात हे गुण-दोष हमखास असतात