TRENDING:

Astro Tips: सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण ठरतात; वेळीच सुधारणा आवश्यक  

Last Updated:
Astro Tips : ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मनुष्याचे आयुष्य सुकर करणाऱ्या गोष्टींची माहिती आणि मार्गदर्शन सांगण्यात आलं आहे. काही गोष्टी केल्यानं आपलं आयुष्य प्रगती पथावर राहतं, तर काही चुकीच्या गोष्टींमुळे लोकांना सतत दारिद्र्य पाहावं लागतं. कोणत्या गोष्टी करण्यासाठी वेळ महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रातही वेळेला महत्त्व दिलं आहे, कोणत्या वेळेला काय करावं आणि कधी काय करू नये, याची माहिती ज्योतिषशास्त्र सांगतं. आज आपण सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं, याविषयी जाणून घेऊ. 
advertisement
1/6
सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण; वेळीच सुधारणा आवश्यक
सूर्योदय हा शुभतेचे प्रतिक मानला जातो, उगवत्या सूर्याला आपण वंदन करतो. सूर्यास्ताच्या नंतर सकारात्मक ऊर्जा भरपूर असते, तितकी सूर्यास्तानंतर असत नाही. सूर्यास्तानंतर अशुभ, नकारात्मक शक्ती जास्त असतात असं मानंलं जातं. म्हणूनच सायंकाळी-सूर्यास्तानंतर काही गोष्टी करून नयेत, असं सांगितलं जातं.
advertisement
2/6
1) घरातील हळद कोणाला देऊ नये - एखादी वस्तू आपण शेजारील लोकांच्याकडून उसनी घेत असतो किंवा देत असतो. पण, सूर्यास्तानंतर घरातील हळद कोणालाही देणं टाळा. हळद सायंकाळच्या वेळी कोणाला देणं म्हणजे घराची सुबत्त घालवण्यासमान आहे. हळदीचा संबंध थेट गुरू ग्रहाशी आहे, त्यामुळे गुरुची स्थिती आपण कमी करतो.
advertisement
3/6
2) सूर्यास्तानंतर झाडू मारणे टाळा - घर स्वच्छ करण्याचे काम शक्यतो सकाळीच उरकावे किंवा फारतर सूर्यास्त होण्यापूर्वी झाडणे-पुसण्याची कामं करून घ्यावीत. पण, सूर्यास्तानंतर झाडूला बिलकूल हात लावून नये, घर झाडू नये. सायंकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते. असे करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी निवास करणार नाही. साफ-सफाई संध्याकाळी आटोपून घ्यावी.
advertisement
4/6
3) सूर्यास्तानंतर काही गोष्टी देऊ नयेत - वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर आपल्या घरातील दूध, दही, पनीर, साखर, मीठ इत्यादी गोष्टी कोणाला कोणत्याही परिस्थितीत देऊ नयेत. आपल्या घरातील पैसा दुसऱ्याला दिल्या समान या गोष्टींचा परिणाम होतो. वरील गोष्टी सायंकाळी कोणाला दिल्यास घराची सुख-समृद्धी त्या व्यक्तीसोबत निघून जाते, असे मानले जाते
advertisement
5/6
4) कपडे धुण्याचे काम - वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कपडे धुवून वाळत घालणं अशुभ मानलं जातं. सूर्यास्त झाल्यानं सायंकाळी वातावरणात नकारात्मकता असते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कपड्यांवर पडतो. असे कपडे आपण घातल्यानं आपल्या कामावर त्याचा अशुभ परिणाम दिसायला लागतो.
advertisement
6/6
5) दही खाणं टाळा - सूर्यास्तानंतर दही खाणं टाळावं. दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा धन-वैभव, आकर्षण आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. सूर्य आणि शुक्र यांच्यात मित्रता भाव नसल्यानं या काळात दही खाणं अनलकी ठरतं. तसंही दही दुपारच्या जेवणात खाण्याचा सल्ला दिला जातो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astro Tips: सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण ठरतात; वेळीच सुधारणा आवश्यक  
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल