TRENDING:

Astrology: भाग्य उजळण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार; जानेवारीत शनिची स्थिती 3 राशीच्या लोकांना लकी

Last Updated:
Astrology 2026 : काही राशीच्या लोकांना गेले कित्येक महिने त्रासातून काढावे लागले, वर्ष 2025 चा शेवटही असाच त्रासदायक असण्याची शक्यता आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 च्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही महत्त्वपूर्ण राजयोग तयार होत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातील या राशींना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवग्रहांपैकी सर्वात प्रभावशाली ग्रह शनी मीन राशीत असेल.
advertisement
1/5
भाग्य उजळण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार; जानेवारीत शनिची स्थिती 3 राशींना लकी
नवीन वर्षात शनी ग्रह सूर्याशी युती करेल, ज्यामुळे पंचांक योग निर्माण होत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सूर्य धनु राशीत असेल. पिता-पुत्र असूनही ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्मफळदात शनी यांच्यात प्रतिकूल संबंध आहेत. पण, या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना विशेष फायदे मिळू शकतात. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. शनि-सूर्याच्या स्थितीचा कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊया.
advertisement
2/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दिनाकं 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:38 वाजता, सूर्य आणि शनि एकमेकांपासून 72 अंशांवर असतील, ज्यामुळे पंचांक योग निर्माण होईल. या काळात कर्माचा कारक शनी ग्रह मीन राशीत आणि सूर्य धनु राशीत आहेत.
advertisement
3/5
धनु राशी - शनि-रविचा पंचाक योग या धनु राशीच्या लोकांना शुभ संकेत घेऊन येतोय. सूर्य लग्नात आणि शनि चौथ्या घरात असल्याने, नशीब तुमच्यासाठी सतत अनुकूल परिणाम देत राहील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी वाढतील आणि नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांसमोर आत्मविश्वासाने तुमची बाजू मांडू शकाल आणि तुमच्या ध्येयांकडे वेगाने वाटचाल करू शकाल.
advertisement
4/5
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी शनि-रविचा पंचाक योग अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरू शकतो. शनि या राशीच्या तिसऱ्या घरात आणि सूर्य बाराव्या घरात असेल. यामुळे थोडा प्रवास करावा लागू शकतो, परंतु यामुळे तुम्हाला मौल्यवान अनुभव, शिकायला आणि नवीन संधी मिळू शकतात. ग्रहांच्या या स्थितीत चिकाटी आणि सातत्य ठेवून, तुम्ही निश्चितच तुमचे ध्येय गाठाल. अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत.
advertisement
5/5
मीन - साडेसातीचे त्रास सहन करत असलेल्या मीन राशीच्या लोकांना जानेवारीत काहीसा दिलासा मिळेल. या महिन्यात तुमचे प्रयत्न तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकतात. तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. कारकिर्दीत अर्थ लाभाचे योग जुळतील. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा आणि आदर केला जाईल. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भाग्य उजळण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार; जानेवारीत शनिची स्थिती 3 राशीच्या लोकांना लकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल