Heart Attack : पेपर संपला आणि सोबत आयुष्यही! सहावीच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे वर्गातच मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
School Boy Heart Attack : पेपर संपला, त्यानंतर तो पाणी प्यायला आणि त्याच्यासोबत भयंकर घडलं, अवघ्या सहावीतल्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
1/5

अमेय सिंह उर्फ आरव नावाचा विद्यार्थी, इयत्ता सहावीत शिकत होता. त्यांच्या परीक्षा सुरू होत्या. माहितीनुसार इंग्रजीचा पेपर होता. आरव शांतपणे बेंचवर बसून पेपर सोडवत होता.
advertisement
2/5
त्याने संपूर्ण पेपर सोडवला, उत्तरपत्रिका शिक्षकांकडे दिली. त्यानंतर तो पाणी प्यायला आणि त्याला मृत्यूनेच गाठलं.
advertisement
3/5
शिक्षकाने सांगितलं की त्याने अडीच तास इंग्रजी पेपर दिला, त्यानंतर तो पाणी प्यायला उठला. पाणी प्यायल्यानंतर तो बेशुद्ध होऊन पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
advertisement
4/5
आधी शाळेत शिक्षकांनी नंतर रुग्णालयात डॉक्टरांनी सीपीआर दिला पण त्याला वाचवतं आलं नाही. त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं प्राथमिक कारण हार्ट अटॅक असं सांगितलं आहे.
advertisement
5/5
उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील ही धक्कादायक घटना आहे. मोंट फोर्ट इंटर कॉलेजमधील या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक, AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Heart Attack : पेपर संपला आणि सोबत आयुष्यही! सहावीच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे वर्गातच मृत्यू