Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; काम बिघडण्याआधीच सावधान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August Weekly Horoscope Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्टच्या या आठवड्यात बुधादित्य आणि गजलक्ष्मीसारखे योग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींना भाग्याची साथ मिळू शकते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/6

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहणार आहे. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांनी अनावश्यक गोष्टींमध्ये न अडकता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे योग्य राहील. तसेच तुम्हाला लोकांशी बोलताना सभ्यता राखावी लागेल. अति स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करू नका; अन्यथा आधी केलेलंही काम बिघडू शकतं. या आठवड्यात हुशारीनं काम करा, कामात खूप काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांची देखील चांगली काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील कोणतीही समस्या सोडवताना किंवा तुमचा मुद्दा मांडताना, कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला नातेवाईकांकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तणावात राहाल. या काळात, तुम्हाला काही अज्ञात धोक्याची भीती देखील वाटू शकते. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांबद्दल खूप धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या.
advertisement
2/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्यशाली आहे. आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ सगळ्यांचे कामात तुम्हाला पूर्ण समर्थन मिळेल. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात भटकत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.
advertisement
3/6
वृषभ - आठवड्याच्या मध्यात, तुमची भेट एका प्रभावशाली व्यक्तीशी होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा इच्छित यश आणि नफ्याचा आठवडा ठरेल. तुम्ही व्यवसायाशी संबंधित मोठे काम करू शकता, ज्यामुळे मार्केटमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला धार्मिक कार्यक्रमांना जावं लागेल. अचानक प्रवासाचे योग येतील. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात, प्रिय जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमची अलिकडची मैत्री प्रेमात बदलू शकते. आरोग्य ठीक राहील.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा खूप शुभ आहे, परंतु नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून तो थोडा प्रतिकूल असू शकतो. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर कुठूनतरी चांगली ऑफर मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, तरी तुम्ही स्वतःहून कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन कराल. या आठवड्यात, तुम्ही आपलं कोण आणि परतं कोण स्पष्टपणे ओळखाल, तुम्हाला जीवनात मोठ्या गोष्टी देखील शिकायला मिळतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यात लपलेली ऊर्जा आणि क्षमता ओळखाल आणि तिचा चांगला वापर करायला शिका.
advertisement
5/6
मिथुन - आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल; अन्यथा, फायद्याऐवजी, आर्थिक नुकसान होऊ शकते. आव्हानात्मक काळात, बरेच लोक तुम्हाला सोडून गेले तरी, तुमचा प्रियकर किंवा तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देईल. आठवड्याच्या शेवटी, प्रवासाची योजना असेल.
advertisement
6/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्यशाली आहे. या आठवड्यात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला भरपूर नफाही मिळेल, पण उत्साहानं हुरळून जाऊ नका, अन्यथा नफ्याची टक्केवारी कमी होऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर खूप मेहनत घ्याल आणि त्याचे परिणामही तुम्हाला दिसतील, परंतु यासोबतच तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येची आणि आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल; अन्यथा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी तुमचा वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापित करा. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे स्वप्न पूर्ण होईल. या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी ठरेल आणि इच्छित लाभ देईल. जमीन आणि इमारत खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल आणि त्यातून तुम्हाला भरपूर नफाही मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही आराम आणि विलासिता संबंधित गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आवडती गोष्ट मिळाल्याने किंवा मोठे यश मिळाल्याने मन आनंदी होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; काम बिघडण्याआधीच सावधान