TRENDING:

Baby Name: बुधवारी जन्मलेल्या बाळांना द्यावी अशी सुंदर नावे; इतक्या गोष्टींसाठी हा जन्म दिवस असतो खास

Last Updated:
Modern Baby Names: बाळाचं नाव काय ठेवावं, यासाठी सध्या लोक फार विचार करतात. एक नाव निवडण्यासाठी खूप विचार केला जातो. यातील सर्वांची कॉमन गोष्ट म्हणजे, नाव मॉर्डन पण त्यांचा चांगला अर्थ असावा. जन्म दिवसानुसार बाळांना नावे द्यावी, त्याचा शुभ परिणाम राहतो, असे मानले जाते. हिंदू धर्मात देवी-देवतांशी संबंधित नावे ठेवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आज आपण बुधवारी जन्मलेल्या बाळांचे काय नाव ठेवावे, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तसेच बुधवारी जन्मलेले लोक कसे असतात हे देखील पाहुया.
advertisement
1/5
बुधवारी जन्मलेल्या बाळांना द्यावी अशी सुंदर नावे; कोणते स्पेशल गुण वाराचे येतात
बुधवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे -अद्वैत: अद्वैत हे गणेशाच्या अनेक नावांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी हे ट्रेंडी आणि आधुनिक नाव ठेवू शकता.अमेय : हे नाव साधं आणि सुंदरही आहे. याचा अर्थ ज्याला मर्यादा नाही. बुधवारी मुलगा झाल्यास त्याला हे शुभ नाव ठेवू शकता.
advertisement
2/5
अथर्व: अथर्व हा एक वेद आहे. तो ज्ञान आणि बुद्धीशी संबंधित आहे. गणराय बुद्धीची देवता आहे, असं नाव तुमच्या मुलाला ठेवू शकता.गौरिक: गौरीचा पुत्र असा अर्थ असलेले हे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू शकता.
advertisement
3/5
बुधवारी जन्मलेले लोक कसे असतात -बुधवारी जन्मलेले लोक कुशाग्र बुद्धीचे आणि तर्क करण्यात पारंगत असतात.बुधवारी जन्मलेले लोक चांगले संवाद साधणारे असतात. हे लोक चांगले वक्ते, लेखक किंवा पत्रकार बनू शकतात.
advertisement
4/5
बुधवारी जन्मलेले लोक स्वभावाने आनंदी असतात, त्यांची विनोदबुद्धी चांगली असते. सहज बोलण्यात विनोद करतात.बुधवारी जन्मलेल्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे हे लोक चांगले व्यापारी बनू शकतात.बुधवारी जन्मलेले लोक बुध ग्रहाच्या प्रभावामुळे नवीन गोष्टी शिकण्यात पटाईत असतात, काहीसा खोडकर स्वभाव असतो.
advertisement
5/5
बुधवारी जन्मलेले लोक विश्वासार्ह आणि हुशार असतात. हे लोक कोणाची फसवणूक करू शकत नाहीत.बुधवारी जन्मलेले लोक खूप सर्जनशील असतात आणि त्यांना संगीत, लेखन, नृत्य यासारख्या गोष्टींमध्ये रस असतो.बुधवारी जन्मलेल्या लोकांना पैशाची चणचण भासत नाही आणि कमी गुंतवणुकीत जास्त पैसे कमावता येतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Baby Name: बुधवारी जन्मलेल्या बाळांना द्यावी अशी सुंदर नावे; इतक्या गोष्टींसाठी हा जन्म दिवस असतो खास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल