Chandra Grahan 2025 Prediction: खग्रास चंद्रग्रहण या जन्मतारखा असणाऱ्यांसाठी अशुभ-अनलकी; मोठ्या अडचणी, बिग लॉस होणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chandra Grahan 2025 Numerology Horoscope Prediction: उद्या 7 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटांचे आहे. हे चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होईल. या चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व मूलांकाच्या लोकांवर होणार आहे. काहींसाठी ते शुभ आणि काहींसाठी अशुभ ठरेल. अंकशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणाचा 5 मूलांकाच्या लोकांवर अशुभ परिणाम होऊ शकतो, त्यांना सावधगिरी बाळगावी लागेल. या लोकांच्या आरोग्यावर, मानसिक शांतीवर आणि संपत्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया चंद्रग्रहणात कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
advertisement
1/5

मूलांक 1 : चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम मूलांक असलेल्या लोकांवर होऊ शकतो. या लोकांना डोळ्यांच्या समस्या बळावू शकतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी, डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागू शकते. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्ही गुलाबी रंग वापरावा, तो फायदेशीर ठरेल.
advertisement
2/5
मूलांक 2: ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. हा मूलांक चंद्राशी संबंधित आहे. चंद्रावर ग्रहण आहे, म्हणून तुम्ही या दिवशी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. वादाचे विषय पुढे ढकलला तर बरे होईल, अन्यथा त्यातून तुमचेच नुकसान होईल. यामुळे तुम्हाला ताण येईल. तुम्ही या दिवशी निळा रंग वापरावा.
advertisement
3/5
मूलाक 5: मूलांक 5 असलेल्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष काळजी घ्यावी कारण या दिवशी तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. चंद्रग्रहणाच्या दिवशी मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार चुकूनही करू नका. या दिवसाचा व्यवहार नंतरसाठी पुढे ढकलून द्या. नोकरदार लोकांनाही चंद्रग्रहणाच्या वेळी समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, तुम्हाला लोकांकडून पाठिंबा मिळणार नाही, यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो.
advertisement
4/5
मूलांक 7: चंद्रग्रहणाच्या दिवशी, मूलांक 7 असलेल्या लोकांच्या घरात किंवा जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे अबोला, दुरावा येऊ शकतो. जोडीदाराला तुमच्या काही गोष्टी आवडणार नाहीत, ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्यावी लागेल आणि तुम्ही स्वतः शांत राहिल्यास ते चांगले होईल. या दिवशी अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल. पैशाची बचत कमी होईल. काही काम अडकू शकते किंवा ते पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल. या दिवशी क्रीम रंग भाग्यवान आहे.
advertisement
5/5
मूलांक 9: चंद्रग्रहणाच्या दिवशी, मूलांक 9 असलेल्या लोकांमध्ये कोणत्यास कामात उत्साह नसेल. सतत अस्वस्थ वाटू शकते. तुम्हाला थकवा जाणवेल. जे लोक व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात, त्यांना थोडे सावध राहावे लागेल कारण तुमचे शत्रू कट रचू शकतात. ते तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात. पण तुम्ही हलगर्जीपणा करू नका. या दिवशी वादांपासून दूर राहा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Chandra Grahan 2025 Prediction: खग्रास चंद्रग्रहण या जन्मतारखा असणाऱ्यांसाठी अशुभ-अनलकी; मोठ्या अडचणी, बिग लॉस होणार