TRENDING:

Margshirsha Purnima 2025: वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद

Last Updated:
Astrology: पौर्णिमा-अमावस्यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. महिन्यातील या दोन्ही तिथींना विविध गोष्टी केल्या जातात. संपूर्ण वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात आणि हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळं महत्त्व आहे. यातील एक विशेष पौर्णिमा म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा.
advertisement
1/5
वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र स्नान करणे आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हणतात.
advertisement
2/5
यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025, गुरुवारी साजरी केली जाईल. या पौर्णिमेला मोक्षदायिनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण ती मोक्ष देते, असे मानले जाते. या दिवशी शांती आणि समृद्धी मिळावी यासाठी अनेक धार्मिक उपाय केले जातात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि चंद्र देवाची पूजा करणे इ. ज्योतिषांच्या मते या वेळी मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते कारण या दिवसापासून काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.
advertisement
3/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरू होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होऊ शकते. ऑफिसमध्ये बढती वगैरेची शक्यता आहे. तुम्हाला पगारात वाढ होऊ शकते. देवी लक्ष्मीच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरू शकतो. 
advertisement
4/5
कर्क - मार्गशीर्ष पौर्णिमा कर्क राशीच्या लोकांसाठी देखील लकी ठरू शकते. काही नवीन काम सुरू कराल. कुटुंबात चांगली बातमी मिळू शकते. माता लक्ष्मी आणि श्री हरीच्या कृपेने विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक मानला जातो. व्यवसायातही फायदा होईल.
advertisement
5/5
तूळ - मार्गशीर्ष पौर्णिमा तूळ राशीसाठी विशेष शुभ मानली जाते. अचानक आर्थिक लाभ, व्यवसायात वाढ आणि कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखादे स्वप्न किंवा योजना दीर्घकाळ अपूर्ण राहिली असेल तर ती या पौर्णिमेने पूर्ण होईल, असे वाटते. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Margshirsha Purnima 2025: वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल