Astrology: फक्त 24 तास वाट पाहा! ग्रहांचा राजकुमार 4 राशींचे नशीब पालटणार, पुन्हा आणेल प्रगती पथावर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar Horoscope: बुधाचे राशीपरिवर्तन ज्योतिषशास्त्रात विशेष मानले जाते. ग्रहांचे राशीपरिवर्तन सतत होत असते, त्यातून काही शुभ-अशुभ योग तयार होतात, त्याचा राशींवर परिणाम होतो. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं त्याच्या स्थितीचा राशीचक्रावर विविध प्रकारे प्रभाव पडतो. दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी रात्री 08:34 वाजता बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
advertisement
1/5

वृश्चिक राशीतील बुधाचे भ्रमण काहींसाठी शुभ असेल तर काहींसाठी नकारात्मक ठरेल. बुधाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली आणि भक्कम होईल. बुधाचा आशीर्वाद मिळणाऱ्या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीसाठी बुधाचे गोचर भारी फायद्याचं असेल. महत्त्वाच्या कामात छोट्या प्रयत्नांमध्ये लक्षणीय यश मिळू शकते. मिथुनेच्या लोकांना कुटुंबातील लोकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो. आपली आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. मिथुनेचे काही लोक परदेश दौऱ्यावर देखील जाऊ शकतात.
advertisement
3/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे भ्रमण लकी ठरेल. या राशीच्या लोकांना नोकरीत प्रचंड यश मिळेल. कन्या राशीचे लोक काही नवीन उपक्रम सुरू करू शकतात. त्यांना व्यवसायातही लक्षणीय नफा मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकलेल्यांना आता दिलासा देणारी बातमी मिळेल, होणारा मोठा खर्च वाचवता येईल.
advertisement
4/5
मकर - बुधाचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी लकी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. घेतलेल्या कर्जातून तुम्ही आता मुक्त व्हाल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये प्रचंड फायदा होईल. नवीन मित्र जोडले जातील, त्यांचा तुम्हाला फायदा होईल. हे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
5/5
कुंभ - बुधाचे भ्रमण कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता देखील असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: फक्त 24 तास वाट पाहा! ग्रहांचा राजकुमार 4 राशींचे नशीब पालटणार, पुन्हा आणेल प्रगती पथावर