TRENDING:

Astrology: मेपर्यंत मेष राशीत ठिय्या देणार गुरू! या राशींना धनलाभ, नोकरी-धंद्यात लाभाचे योग

Last Updated:
Jupiter Transit 2024 : ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचा राशी बदल खूप शुभ मानला जातो. गुरू सध्या मेष राशीमध्ये संक्रमण करत आहे आणि तो 1 मे 2024 पर्यंत मेष राशीत असेल. या स्थितीत सिंह राशीकडे तो पंचम दृष्टीनं पाहील, तर त्याच्या सप्तम दृष्टीनं तो तूळ राशीकडे पाहील आणि त्याच्या नवव्या दृष्टीनं तो स्वतःच्या राशी धनुकडे पाहिल. बृहस्पतिला तीन दृष्टी आहेत. अशा एकंदर गृहस्थितीमुळे काही राशींचे भाग्य त्यांच्या 3 दृष्टी आणि संक्रमणामुळे चमकू शकते. तसेच या राशींच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
advertisement
1/6
मेपर्यंत मेष राशीत ठिय्या देणार गुरू! या राशींना धनलाभ, नोकरी-धंद्यात लाभाचे योग
मेष - गुरूच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण गुरू मेष राशीत भ्रमण करत आहे. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
advertisement
2/6
मेष - या काळात नव-नवीन गोष्टी शिकण्याच्या क्षमतेत वाढ दिसून येईल. तुमच्या कार्यशैलीतही सुधारणा दिसून येईल. तुमच्या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे नशीब तुम्हाला साथ देईल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
advertisement
3/6
कर्क - मेष राशीतील गुरुचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण गुरू हा ग्रह तुमच्या राशीतून कर्म गृहात जाणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे करिअर खूप चांगले होणार आहे.
advertisement
4/6
कर्क - काही परदेशी डीलच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकेल. या काळात व्यावसायिकांसाठी अनेक मार्ग खुले होतील. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांचे संबंध सुधारतील.
advertisement
5/6
सिंह - मेष राशीत गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीत नवव्या घरातून जात आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकते. तुमच्या नियोजित योजनांमध्येही तुम्हाला यश मिळेल.
advertisement
6/6
आर्थिक दृष्टिकोनातून सिंह राशीसाठी हे संक्रमण आश्चर्यकारक असणार आहे. तुम्हाला एकामागून एक अनेक आर्थिक लाभ मिळणार आहेत. या व्यतिरिक्त, तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता, जे शुभ राहील. धार्मिक कार्यातही पैसा खर्च करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: मेपर्यंत मेष राशीत ठिय्या देणार गुरू! या राशींना धनलाभ, नोकरी-धंद्यात लाभाचे योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल