TRENDING:

Janmashtami 2025: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक लाभदायी योग! 3 राशींचे नशीब पालटणार, शुभ शकुन

Last Updated:
Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण संपूर्ण भारतात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट रोजी आणि कालाष्टमी-गोपाळकाला 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या सणानिमित्त काही विशेष योग तयार होत आहेत, त्यानं काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
1/5
यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक लाभदायी योग! 3 राशींचे नशीब पालटणार, शुभफळ
यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक अद्भुत योगायोग घडत आहेत. श्रावणातील रोहिणी नक्षत्रात कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. अष्टमी तिथी शुक्रवारी रात्री ११.४८ वाजता सुरू होईल, परंतु उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 16 तारखेला म्हणजेच 15 ऑगस्टच्या रात्री असेल.
advertisement
2/5
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव - जरी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रांचे मिलन होत नसले तरी उदय तिथीमुळे जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी असेल. या दिवशी अमृतसिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगाचा एक अद्भुत योग तयार होत आहे. या शुभ योगांचा लाभ तीन राशीच्या लोकांना होईल.
advertisement
3/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांना जन्माष्टमीला होणाऱ्या योगामुळे अनेक फायदे होणार आहेत. श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं काही राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये खूप प्रगती करू शकाल. प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले राहील. अचानक पैसे मिळाल्यानं तुम्हाला मोठी समस्या सोडवण्यास मदत होईल.
advertisement
4/5
धनु - धनु राशीच्या लोकांना जन्माष्टमी दिवशी विशेष आशीर्वाद मिळतील. करिअरमध्ये पद वाढू शकते. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होईल. नवीन गुंतवणूकीचे मार्ग उघडतील आणि चांगला नफा मिळू शकेल. संपत्ती समृद्धी वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस खूप चांगला असेल. समाजात आदर वाढेल.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना या जन्माष्टमीला नोकरीशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. तुम्ही इच्छित नोकरी किंवा व्यवसायात पाऊल ठेवू शकता. जन्माष्टमीला होणाऱ्या शुभ योगात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. प्रेम जीवनात एक पाऊल पुढे टाकण्याचा मार्ग दिसेल प्रेमजीवन लग्नाचा मार्ग धरेल. जन्माष्टमीला कुंभ राशीच्या लोकांना बाळकृष्णाचे विशेष आशीर्वाद मिळतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Janmashtami 2025: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक लाभदायी योग! 3 राशींचे नशीब पालटणार, शुभ शकुन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल