आता मस्त आनंदात राहायचं! 5 डिसेंबरला गुरु ग्रहाचं भ्रमण, या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार, डिसेंबर 2025 हा महिना अनेकांसाठी नशीब जागवणारा ठरणार आहे. वर्षाच्या अखेरीस ग्रहस्थितीत मोठे बदल होत असल्याने काही राशींवर गुरू ग्रहाची विशेष कृपा राहणार आहे.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, डिसेंबर 2025 हा महिना अनेकांसाठी नशीब जागवणारा ठरणार आहे. वर्षाच्या अखेरीस ग्रहस्थितीत मोठे बदल होत असल्याने काही राशींवर गुरू ग्रहाची विशेष कृपा राहणार आहे. 5 डिसेंबर रोजी गुरू ग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे. आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरूच्या या हालचालीमुळे काही व्यक्तींच्या करिअरमध्ये निर्णायक परिवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
2/6
गुरू ग्रह 5 डिसेंबर 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करून वक्री होईल. या संक्रमणामुळे काही राशींना करिअर, आर्थिक क्षेत्र, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः तीन राशींवर या संक्रमणाचा प्रभाव अधिक अनुकूल राहील.
advertisement
3/6
वृषभ - गुरू ग्रहाची स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य देणारी ठरेल. वडिलोपार्जित व्यवसायात असणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. घर, मालमत्ता किंवा पारिवारिक व्यवसायाशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. बचतीत वाढ अपेक्षित असून, आर्थिक नियोजनात यश मिळेल. करिअरच्या क्षेत्रात अडकलेली कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. भावंडांकडूनही प्रोत्साहन मिळून तुमची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समाधानकारक असेल. मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
4/6
सिंह - सिंह राशीसाठी गुरूचे संक्रमण अत्यंत भाग्यवर्धक मानले जात आहे. आधीपासून प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना विस्ताराची मोठी संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ, नव्या करारांची शक्यता आणि कामात प्रगती दिसू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना आकर्षक संधी मिळू शकतात. सरकारी नोकरीत असलेल्यांना पदोन्नतीचा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होईल. गुरूचे मिथुन राशीत प्रवेश तुमच्या वक्तृत्वशैलीत सुधारणा घडवून आणेल, ज्याचा उपयोग व्यावसायिक क्षेत्रात होऊ शकतो.
advertisement
5/6
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींना या कालावधीत मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढल्याचे जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सुधारेल. काहींना नव्या जबाबदाऱ्यांची संधी मिळेल, ज्यातून करिअरमध्ये मोठी प्रगती साध्य होऊ शकते. ज्यांना परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा काळ फार शुभ मानला जात आहे. गुरूचा प्रभाव तुम्हाला नव्या संधींचे दरवाजे उघडून देईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अभ्यासात प्रगती करणारा आणि यश देणारा ठरेल.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही.)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आता मस्त आनंदात राहायचं! 5 डिसेंबरला गुरु ग्रहाचं भ्रमण, या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल