'अमिताभसोबतचं लग्न आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक', जया बच्चन लग्नाच्या 52 वर्षांनी असं का म्हणाल्या?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Jaya Bachchan on Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी नुकतंच एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. अमिताभ यांच्यासोबतचं लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक, असंही यावेळी जया बच्चन म्हणाल्या.
advertisement
1/7

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे फिल्म इंडस्ट्रीतील एक आदर्श लोकप्रिय जोडपं आहे. समजदार, धैर्य, प्रेम, समर्पण अशा अनेक गोष्टी त्यांच्यात पाहायला मिळतात. दोघांनाही आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण त्यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. दोघांचे स्वभाव जरी भिन्न असले तरी ते एकमेकांसाठी कायम हजर असतात.
advertisement
2/7
जया बच्चन यांनी नुकतंच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याने सर्वांना हैरान केलं आहे. 'द वूमन इवेंट'च्या एका पॅनल डिस्कशनमध्ये जया बच्चन म्हणाल्या,"कायदेशीर वैधता नातेसंबंधाची व्याख्या करत नाही".
advertisement
3/7
जया बच्चन पुढे म्हणाल्या,"लग्नाचा लाडू हा एक असा लाडू आहे तो खाल्लात तरी पस्तावता आणि नाही खाल्ला तरी पस्तावाल. फक्त आयुष्याचा आनंद घ्या. गोष्टी फॉर्मल करण्याची गरज नाही".
advertisement
4/7
जया बच्चन यांनी आपल्या लग्नाबाबतचा एक किस्सादेखील शेअर केला. जया म्हणाल्या,"आम्ही आधी कायदेशीररित्या लग्न रजिस्टर केलं नव्हतं. नंतर आम्हाला कळलं की हे रजिस्टर करायचं असतं. लग्नानंतर अनेक वर्षांनी आम्ही लग्न रजिस्टर केलं. त्यावेळी आम्ही अवैध स्वरुपात राहत होतो".
advertisement
5/7
अमिताभ बच्चन यांचेदेखील लग्नाबाबत असेच विचार आहेत का? असा प्रश्न जया यांना विचारण्यात आला. त्यावेळी जया यांनी हसत उत्तर दिलं,"मी त्यांना याबद्दल कधीही विचारलं नाही. खरंतर ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण आता मला याबद्दल काही बोलायचं नाही".
advertisement
6/7
जया म्हणाल्या,"अमिताभ यांचे लग्नाबाबतचे विचार जरी वेगळी असतील तरी पहिल्या नजरेतच मी त्यांच्या प्रेमात पडले होते. मी गेल्या 52 वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत राहत आहे. आता यापेक्षा मी त्यांच्यावर जास्त प्रेम करू शकत नाही. आमचं पहिल्या नजरेतलं प्रेम होतं".
advertisement
7/7
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 52 वर्षे झाली आहेत. ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही त्यांची दोन मुलं आहेत. आजही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सोशल मीडियावर तेवढेच सक्रीय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अमिताभसोबतचं लग्न आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक', जया बच्चन लग्नाच्या 52 वर्षांनी असं का म्हणाल्या?