TRENDING:

Interesting Facts : काय सांगता.. 'या' गावात केवळ एकाच किडनीवर जगतात लोक! किडनी व्हॅली नावाने आहे प्रसिद्ध

Last Updated:
Village full of people with single kidney : हे ठिकाण 'वन किडनी व्हिलेज' किंवा 'किडनी व्हॅली' म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही अनेक गावांबद्दल ऐकले असेल, परंतु या अनोख्या गावाबद्दल तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी आहे. चला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.
advertisement
1/5
काय सांगता.. या गावात केवळ एकाच किडनीवर जगतात लोक! किडनी व्हॅली नावाने प्रसिद्ध
नेपाळची राजधानी काठमांडूपासून फक्त 20 किमी अंतरावर असलेले होक्से गाव 'वन किडनी व्हिलेज' म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाला अशी मिळण्याचे कारण म्हणजे, या गावातील सुमारे 92 टक्के पुरुषांना फक्त एकच किडनी आहे.
advertisement
2/5
या गावात अशी परिस्थिती म्हणजेच एक किडनी असणे ही जन्मजात स्थिती नाही. खरं तर गावकऱ्यांनी पैशासाठी त्यांची एक एक किडनी विकली आहे. हे सर्व 2015 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर सुरू झाले, ज्याने संपूर्ण गाव उद्ध्वस्त केले.
advertisement
3/5
यानंतर, वाढत्या महागाईच्या काळात मानवी तस्करांच्या टोळ्या आल्या आणि त्यांनी लोकांची किडनी काढायला सुरुवात केली. येथील अवयव तस्कर अनेकदा निष्पाप लोकांना अडकवतात आणि त्यांची किडनी काढून घेतात.
advertisement
4/5
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांची एक किडनी 2-3 लाख रुपयांना विकली. किडनीशी संबंधित आजार असलेल्या गावकऱ्यांना रुग्णालयात भेटायला सुरुवात केली तेव्हा हे उघड झाले.
advertisement
5/5
नेपाळ सरकारने केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, गावातील 92 टक्के पुरुषांनी आणि अनेक महिलांनी त्यांची एक एक किडनी विकली होती. येथील लोक उदरनिर्वाहासाठी अनेकदा फक्त 2000 रुपयांना त्यांची किडनी विकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : काय सांगता.. 'या' गावात केवळ एकाच किडनीवर जगतात लोक! किडनी व्हॅली नावाने आहे प्रसिद्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल