TRENDING:

Mumbai Famous Street Food : एकदा खाल तर सगळ्यांना सांगाल, मुंबईतल्या खाऊ गल्ल्यांची टेस्टच भारी, 'हे' लोकेशन माहितीये का

Last Updated:
Mumbai khau galli : मुंबईतल्या खाऊ गल्ल्या म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गच. इथल्या पावभाजी, वडापाव, तंदुरी आणि इतर स्ट्रीट फूडची चव अशी की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा यायला भाग पडतं.
advertisement
1/7
एकदा खाल तर सगळ्यांना सांगाल, मुंबईतल्या खाऊ गल्ल्यांची टेस्टच भारी
मुंबईत अनेक खाऊ गल्ली आहे पण काही खाऊ गल्ली ही खवय्यांच्या विशेष आवडीच्या आहेत. येथील अनोखी चव, विविध पदार्थ आणि परवडणारे दर यामुळे लोक दूरवरूनही येऊन खाण्याचा आनंद घेतात. प्रत्येक गल्लीची स्वतःची खाद्यसंस्कृती आणि खासियत पाहायला मिळते.
advertisement
2/7
संध्याकाळी ऑफिसची दमछाक झाल्यावर किंवा शॉपिंगनंतर पोटात कावळे ओरडताच पावलं थेट खाऊ गल्लीकडे वळतात. कॉलेजचे तरूण असो किंवा शाळेचे विद्यार्थी आणि खादाड मंडळींसाठी ही गल्ली म्हणजे चविष्ट पदार्थांची मेजवानीच. येथे प्रत्येकाला आवडता खाऊ सहज मिळतो.
advertisement
3/7
महत्त्वाचे म्हणजे कमी किंमतीत खाऊ गल्लीत हॉटेलसारखे स्वादिष्ट पदार्थ सहज मिळतात. येथे मिळणाऱ्या पदार्थांची चव उत्तम असते आणि खिसाला परवडणारीही असते. त्यामुळे कमी पैशात स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी खाऊ गल्ली हा उत्तम पर्याय ठरत असतो.
advertisement
4/7
खारघरच्या उत्सव चौकाजवळ असलेली खाऊ गल्ली खाद्यप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. येथे फ्राईड राईस, नूडल्स, मंचुरियन, वडापाव, डोसा आणि मोमोजसह अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. संध्याकाळी या खाऊ गल्लीमध्ये खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
advertisement
5/7
मोहम्मद अली रोडवरील खाऊ गल्ली मुंबईतील मांसाहारी स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारचे कबाब आणि खास मसालेदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रोज मोठी गर्दी असते. खादाडीप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण ठरते
advertisement
6/7
माहिम खाऊ गल्ली हे मुंबईकरांचे आवडते फूड स्पॉट. येथे व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. गरमा-गरम पावभाजीपासून चविष्ट चिकन तंदूरीपर्यंत सर्व काही इथे अप्रतिम मिळतं. खवय्यांसाठी ही गल्ली म्हणजे खरंच स्वर्ग आहे.
advertisement
7/7
कार्टर रोड खाऊ गल्ली ही मुंबईतील एक प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे जी समुद्रकिनारी वसलेली आहे. येथे समोसा, भेळ असे पदार्थ मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Mumbai Famous Street Food : एकदा खाल तर सगळ्यांना सांगाल, मुंबईतल्या खाऊ गल्ल्यांची टेस्टच भारी, 'हे' लोकेशन माहितीये का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल