TRENDING:

वृषभ राशीत लक्ष्मी नारायण योग, या 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार 'अच्छे दिन'

Last Updated:
वैदिक ज्योतिष गणनेनुसार, एक विशिष्ट कालावधी झाल्यावर सर्व ग्रह आपली राशी परिवर्तन करतात. हिंदू पंचांगानुसार, मे महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच वृषभ राशीत ग्रहांचे गोचर होत आहे. यामुळे वृषभ राशीत बुध-शुक्राची युती होईल. यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
advertisement
1/6
वृषभ राशीत लक्ष्मी नारायण योग, 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार 'अच्छे दिन'
वैदिक ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण योग खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार आहे. कुणावर हा प्रभाव सकारात्मक तर कुणावर हा प्रभाव नकारात्मक दिसणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने कोणत्या राशीला याचा फायदा होणार आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
2/6
अयोध्येतील ज्योतिष पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह निश्चित काळानंतर आपली राशी किंवा चाल परिवर्तन करतात. राशी परिवर्तन केल्यावर सर्व ग्रह राजयोगही तयार करतात.
advertisement
3/6
ज्योतिष गणनेनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वृषभ राशीत शुक्र आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. याचा प्रभाव तीन राशींवर पडताना दिसेल.
advertisement
4/6
कुंभ राशी : कुंभ राशीच्या लोकांना एक चांगली बातमी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करू शकतात. नोकरीत प्रमोशन मिळेल. कौटुंबिक संबंध चांगले होतील. वैवाहिक जीवनातील समस्या समाप्त होतील. आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
advertisement
5/6
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर मध्ये प्रगती होईल. व्यवसायासाठी चांगली वेळ आहे. कुटुंबात सुख समृद्धी येईल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.
advertisement
6/6
मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी प्रत्येक प्रकारचा फायदा होईल. अधिक काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. थांबलेले कार्य पूर्ण होईल. आरोग्य आधीपेक्षा चांगले होईल. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. (सूचना - ही बातमी ज्योतिषांसोबत साधलेल्या संवादानंतर लिहिली गेली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
वृषभ राशीत लक्ष्मी नारायण योग, या 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार 'अच्छे दिन'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल