TRENDING:

Surya Guru Astro: अपेक्षा नसताना मोठा लाभ! प्रामाणिक कष्टाची कदर, जानेवारीतील प्रतियुती योग 5 राशींना लकी

Last Updated:
Surya Guru Pratiyuti Yog 2026: Surya Guru Astro: नवीन वर्ष 2026 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचे गुरु बृहस्पती यांच्यात एक विशेष युती होणार आहे, ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. 10 जानेवारी शनिवार रोजी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून 180 अंशांवर विराजमान असतील, ज्यामुळे सूर्य गुरु प्रतियुति योग निर्माण होईल. हा योग एका राजयोगासारखा मानला जातो.
advertisement
1/6
अपेक्षा नसताना मोठा लाभ! प्रामाणिक कष्टाची कदर, प्रतियुती योग 5 राशींना लकी
सूर्य आणि गुरुच्या या युतीमुळे धन, संपत्ती, ज्ञान, सामाजिक प्रतिष्ठा, पद, सुख आणि सौभाग्यात वाढ होते. त्या वेळी गुरु मिथुन राशीत आणि सूर्य देव धनु राशीत असतील. जाणून घेऊया या युतीचा फायदा कोणत्या 5 राशींना होणार आहे.
advertisement
2/6
सूर्य आणि गुरुच्या प्रतियुति योगाचा शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांच्या जीवनात पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचे पद आणि प्रभाव वाढू शकतो, तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प मिळू शकतो. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढण्याची अपेक्षा आहे. शुभ प्रभावामुळे तुमची कामे यशस्वी होतील.
advertisement
3/6
प्रतियुति योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे मनोबल चांगले होईल, कोणतेही काम पूर्ण ऊत्साहानं करतील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीची चांगली संधी मिळू शकते. हा काळ तुमच्या प्रगतीचा असेल.
advertisement
4/6
प्रतियुति योगामुळे तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा या काळात उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत तयार होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. एकूणच तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. करिअरमध्ये तुमची स्थिती मजबूत होईल आणि पदोन्नती किंवा नवीन नोकरीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते.
advertisement
5/6
सूर्य आणि गुरुच्या युतीचा शुभ प्रभाव असल्याने धनू राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. वडील आणि गुरूंकडून तुम्हाला विशेष मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वडील आणि गुरूंची सेवा करण्याची संधी हातातून जाऊ देऊ नका, त्याचा तुम्हाला लाभ होईल. परदेश प्रवास किंवा परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
प्रतियुती योगाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांनाही मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात तुमचा पगार वाढण्याची किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या विचारांचे आणि कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कामकाजाच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Guru Astro: अपेक्षा नसताना मोठा लाभ! प्रामाणिक कष्टाची कदर, जानेवारीतील प्रतियुती योग 5 राशींना लकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल