आता काही खरं नाही! मंगळ-राहूची चाल बिघडवणार 3 राशींच्या लोकांचा खेळ, आयुष्यात येणार मोठं संकट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ आणि मायावी ग्रह राहू यांची युती कुंभ राशीत होणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ आणि मायावी ग्रह राहू यांची युती कुंभ राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ आणि राहू एकाच राशीत येतात, तेव्हा 'अंगारक योग' किंवा 'विस्फोटक योग' निर्माण होतो. हा योग अत्यंत उग्र आणि अशुभ मानला जातो.
advertisement
2/7
23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे राहू आधीपासूनच विराजमान आहे. ही स्थिती विशेषतः मेष, मकर आणि मीन या तीन राशींच्या जातकांसाठी करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठी आव्हाने उभी करू शकते.
advertisement
3/7
मंगळ हा अग्नी, क्रोध आणि ऊर्जेचा कारक आहे, तर राहू हा भ्रम, अचानक घडणाऱ्या घटना आणि विनाशाचा कारक आहे. जेव्हा या दोन ग्रहांची शक्ती एकत्र येते, तेव्हा व्यक्तीच्या स्वभावात कमालीची आक्रमकता आणि अधीरता येते. यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्याचा थेट परिणाम करिअर आणि संपत्तीवर होतो.
advertisement
4/7
मेष: मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे. अंगारक योगामुळे तुमच्या राशीच्या जातकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होतील. तुमच्या रागामुळे वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे नोकरीवर टांगती तलवार येऊ शकते. अचानक मोठे खर्च समोर येतील, ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन कोलमडेल.
advertisement
5/7
मकर: मकर राशीसाठी हा योग दुसऱ्या भावात बनत आहे. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कोणालाही कर्ज देणे किंवा कोणाकडून उधार घेणे टाळा, कारण दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायात भागीदारावर आंधळा विश्वास ठेवू नका. या काळात गुंतवणुकीचे कोणतेही मोठे निर्णय तूर्तास पुढे ढकलणे हिताचे ठरेल.
advertisement
6/7
मीन: मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ आरोग्याच्या आणि करिअरच्या दृष्टीने धावपळीचा असेल. नोकरी सोडण्याचा किंवा बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ योग्य नाही. नवीन ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. ऑफिसमध्ये तुमच्याविरुद्ध काही लोक गुप्त हालचाली करू शकतात. तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका.
advertisement
7/7
अंगारक योगाचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, नियमितपणे हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करा आणि मंगळवारी उपवास करा. तांब्याची किंवा लाल वस्तू दान करा. लाल गायीला गूळ खाऊ घाला. हे उपाय अंगारक योगाच्या नकारात्मक प्रभावांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आता काही खरं नाही! मंगळ-राहूची चाल बिघडवणार 3 राशींच्या लोकांचा खेळ, आयुष्यात येणार मोठं संकट