TRENDING:

Money Mantra: मंगळवार लकी! या राशींना अनपेक्षित यश, पैसा येणार; शासनाच्या योजनेचा लाभ

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
advertisement
1/12
मंगळवार लकी! या राशींना अनपेक्षित यश, पैसा येणार; शासनाच्या योजनेचा लाभ
मेष (Aries) : आज तुमचं मन साधी कामं सोडून बदलांकडे आकर्षित होऊ शकतं. व्यवसायातले सहकारी तुमच्याकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेतील. आदर वाढेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आदर मिळेल. कौटुंबिक संपत्ती वाढेल.उपाय : भुकेल्यांना अन्नदान करा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज राजकीय दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. लोकांचं सहकार्य मिळाल्याने मन आनंदी राहील. प्रशासनाचा पूर्ण लाभ मिळेल आणि शासनाच्या योजनेचा लाभ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील.उपाय : पांढरे रेशमी कपडे दान करा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी चांगला खर्च होईल. आज कार्यक्षेत्रात तुम्हाला वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. सहकारीसुद्धा तुमच्या सल्ल्याने काम करतील. त्यामुळे मन आनंदी राहील. तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज परत मिळू शकतात.उपाय : पिवळ्या वस्तू दान करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज ऑफिसमध्ये तुमच्या मनासारखं वातावरण असेल. तुम्ही काही खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल साधावा लागेल. अन्यथा आगामी काळात तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.उपाय : आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.
advertisement
5/12
सिंह (Leo) : नोकरीत तुमचे शत्रूही समोर हितचिंतक बनतील; पण तुमच्यामागे ते अडथळे निर्माण करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस शुभ राहील.उपाय : लक्ष्मीमातेची पूजा करा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : व्यवसायात तुमच्या मेहनतीचं फळ न मिळाल्याने आज तुम्ही निराश दिसाल. परंतु, तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम, सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात काही लाभ होण्याची शक्यता असेल तेव्हाच काही अडथळे येतील. त्यामुळे कोणालाही कर्ज देणं टाळा. संध्याकाळी मित्रांच्या मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.उपाय : माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.
advertisement
7/12
तूळ (Libra) : कार्यक्षेत्रात काही वाद चालू असतील तर आज ते सोडवता येतील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही नवीन प्रोजेक्टवरदेखील काम करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत काही महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे आज काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यवसायात चढ-उतार असतील, तरीही तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक नफा मिळवण्याच्या संधी मिळतील.उपाय : हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : नोकरी-व्यवसायात काही इनोव्हेशन आणलंत, तर तुम्हाला नंतर फायदा होईल. कामात नवा उदय होईल.उपाय : विष्णुसहस्रनाम म्हणा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज कार्यक्षेत्रात काम करताना सावध आणि सतर्क राहा. कारण शत्रू तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस शुभ राहील. आज, पैसे कमावण्यासाठी अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठीही वेळ मिळेल. व्यवसायात कोणतीही रिस्क घ्यायची असेल, तर वडिलांचा सल्ला अवश्य घ्या.उपाय : गरजूंना मदत करा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्यात भरपूर नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित निर्णय घ्यावा लागेल. सरकारी नोकरीशी संबंधित व्यक्तींना आज प्रामाणिकपणे काम करावं लागेल आणि नियमांची काळजी घ्यावी लागेल.उपाय : गणपतीला लाडू अर्पण करा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कार्यक्षेत्रात कोणतंही काम घाईघाईत करू नका. अन्यथा चूक होऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक कृती करा.उपाय : शिवजप करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : तुमच्या व्यवसायात कोणतीही जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या भावंडांचंही सहकार्य मिळेल. आज तुमचा खर्च जास्त होईल आणि उत्पन्न कमी असेल. तरीही तुमची आर्थिक स्थिती सामान्य असेल. आज तुम्हाला काही मोठं काम करायचं असेल तर तुमच्या घरातल्या सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला यात यश मिळेल.उपाय : शनिचालिसा म्हणा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: मंगळवार लकी! या राशींना अनपेक्षित यश, पैसा येणार; शासनाच्या योजनेचा लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल