Money Mantra: शुक्रवार भाग्याचा! या राशींची प्रलंबित कामं पूर्ण होणार, आर्थिक लाभाचे योग
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं शुक्रवारच्या दिवसाचं (27 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
advertisement
1/12

मेष (Aries) : कामाची कौशल्यं वाढतील. खूप धावपळ होईल. पैसेही खर्च होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे काही बदल होतील. त्यामुळे तुमची कामाची कौशल्यं वाढतील; मात्र हे पाहिल्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे काही नव्या शत्रूंचा उदय होऊ शकतो.उपाय : लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. सरकारी नोकरीत असलेल्यांना आज आर्थिक लाभ मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. बिझनेसमध्ये योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी प्रभावी ठरतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे तुम्हाला भविष्याबद्दलची चिंता कमी वाटेल.उपाय : विष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : अचानक, अपघाताने पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. त्यामुळे तुमच्या प्रभावात वाढ होईल. भावांच्या मदतीने तुम्ही अडकलेली कामं पूर्ण करू शकाल. राजकीय क्षेत्राशी निगडित व्यक्तींना आज लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.उपाय : पिवळ्या वस्तू दान करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : प्रेमजीवनात गोडवा येईल. कौटुंबिक काँटॅक्ट्सकडून आज फायदा होईल. अडकलेले पैसे मिळाल्यामुळे पैशांत वाढ होईल. आधीच्या दिवसांच्या तुलनेत उत्पन्न वाढेल. दैनंदिन खर्च सहज भागतील. भविष्याची चिंता कमी होईल. बिझनेस प्लॅन्सना गती मिळेल. प्रतिष्ठाही वाढेल. सासरकडच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता.उपाय : केळीच्या झाडाचं मूळ पिवळ्या कापडात बांधून ते गळ्याभोवती परिधान करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : निर्णय घेणं सुलभ होईल. दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामाबद्दल निर्णय घ्यावा लागेल. ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुटुंबीयाचं मार्गदर्शन त्यासाठी साह्यभूत ठरेल. स्पर्धेत तुम्ही पुढे जाल. मित्रांच्या मदतीने अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल.उपाय : शिवचालिसा म्हणा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज वर्क बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे समाधानकारक लाभ मिळतील. ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही पैसे खर्च कराल. पवित्र कामांसाठीही काही खर्च कराल. नोकरदार व्यक्तींना छोटे वाद टाळावे लागतील. अन्यथा भविष्यात नातेसंबंध बिघडतील. बिझेनसमधल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी बनाल.उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : इतरांपेक्षा चांगलं काम कराल. बिझनेसमध्ये अतिरिक्त धावपळ करावी लागल्याने हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींना इतरांपेक्षा चांगलं काम केल्याबद्दल गौरवलं जाईल. पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा असेल, तर त्यासाठी दिवस चांगला आहे.उपाय : घराच्या मुख्य दरवाजात थोडा गूळ ठेवा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. कामाच्या ठिकाणी जुन्या प्रकरणावरून मतभेद वाढतील; पण सद्सद्विवेकबुद्धी राखल्यामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही. काही जुने बिझनेसविषयक संबंध बिघडतील.उपाय : भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत असेल. कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे टेन्शन काहीसं वाढू शकतं. तुम्हाला तुमच्या वाणीवर बंधन ठेवायला हवं. वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. प्रकरण कोर्टात असल्यास तुम्हाला त्यासाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा पैसे अडकून पडू शकतात. बिझनेसची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमची प्रसिद्धी, तुमच्याविषयीचा आदर वाढेल.उपाय : गुरुवारी उपवास करणाऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावेत.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : वाहन अपघातामुळे ब्रेकडाउन झाल्यामुळे खर्च वाढतील. सावध राहा. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला खूप बुद्धिमान समजलं जाईल; पण घरातली प्रतिमा खराब असेल. घरातल्या कामांकडे दुर्लक्ष केल्यास घरात अनागोंदी माजेल. बऱ्याच उपयुक्त वस्तूंवर पैसे खर्च केले जातील.उपाय : चणा डाळ, गूळ, हळद घालून कणीक मळा आणि गायीला खाऊ घाला.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आज जबाबदाऱ्यांचा ताण वाढेल. बिझनेस क्षेत्रात नफा मिळेल. आनंद होईल. कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी त्याबद्दल नीट तपास करा. कागदपत्रं तपासा. बिझनेसमध्ये बदल करण्याचा विचार करत असलात, तर दिवस अनुकूल ठरेल.उपाय : श्री विष्णूला बेसन लाडू अर्पण करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. हवं असलेलं यश मिळवण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे केवळ जे पूर्ण करायचं आहे तेच काम करा. नव्या कामात आई-वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. बिझनेसची होत असलेली प्रगती पाहण्यात तुम्हाला खूप आनंद मिळेल.उपाय : पिंपळाच्या झाडाखाली 5 दिवे लावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: शुक्रवार भाग्याचा! या राशींची प्रलंबित कामं पूर्ण होणार, आर्थिक लाभाचे योग