TRENDING:

Numerology: भयंकर त्रासदायक, पटवून न घेणारी माणसं शक्यतो या 3 तारखांना जन्मलेली असतात; मूळ स्वभावच..

Last Updated:
Numerology Marathi: प्रत्येक व्यक्तीची एक मूलांक संख्या असते, जन्मतारखेवरून मूलांक संख्या काढली जाते. मूलांकावरून व्यक्तीची अनेक गुपिते जाणून घेऊ शकतो. मूलांकावरून त्या व्यक्तीच्या आवडी-निवडींबद्दल देखील जाणून घेता येतं. काही लोकांचे स्वभाव फार विचित्र, रागीट, फारच शांत, पूर्ण खुलं मन, अशा विविध प्रकारचे असतात. आज आपण मूलांक 5 असलेल्या लोकांबद्द्ल जाणून घेऊया.
advertisement
1/6
भयंकर त्रासदायक, पटवून न घेणारी माणसं शक्यतो या 3 तारखांना जन्मलेली असतात
ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह या मूलांकाचा अधिपती आहे. म्हणून या मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा आशीर्वाद असतो. जाणून घेऊया 5 मूलांकाचे लोक कसे असतात...
advertisement
2/6
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखांच्या लोकांना प्रेम जीवनात अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागते. त्यांना खरे प्रेम मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांचं प्रेम नसतं किंवा इच्छा कमी असते, अशा गोष्टी नसतात. परंतु त्यांना प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता राखणं कठीण जातं. कधीकधी ते त्यांच्या जोडीदाराशी फार खेळीमेळीनं राहतात आणि लगेच बिनसतात पण. या लोकांना प्रेमात संयम आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते.
advertisement
3/6
5 मूलांकाचे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात. त्यांना त्यांच्या जोडीदारात खूप स्वातंत्र्य आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते. त्यांचा जोडीदार खूप नियंत्रित किंवा भावनिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ते लवकर कंटाळू शकतात आणि नात्यात अंतर वाढू लागते.
advertisement
4/6
म्हणूनच प्रेमात त्यांना दीर्घ संघर्ष करावा लागतो, योग्य व्यक्तीची वाट पाहावी लागते. त्यांना त्यांच्या जोडीदाराशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. पण, योग्य जोडीदार सापडल्यास त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि संतुलित बनते.
advertisement
5/6
अस्थिर वाटणारे 5 मूलांकाचे लोक तसे खूप प्रेमळ असतात, जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रणय आणि साहस दोन्ही आवडतात, म्हणून त्यांचे नाते कधीकधी थोडे विचित्र वाटू शकते. त्यांच्याकडे लोकांना जवळ आणणारे एक आकर्षण आणि ऊर्जा असते.
advertisement
6/6
मूलांक 5 असलेल्या लोकांचा प्रेमात संघर्ष होण्याची शक्यता असते, परंतु त्यांना योग्य वेळी योग्य व्यक्ती सापडते तेव्हा त्यांचे जीवन आनंदी आणि स्थिर होते. त्यांना फक्त संयम आणि समजूतदारपणाने प्रेम करण्याची आवश्यकता असते आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंद आणि समाधानी राहू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: भयंकर त्रासदायक, पटवून न घेणारी माणसं शक्यतो या 3 तारखांना जन्मलेली असतात; मूळ स्वभावच..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल