TRENDING:

Numerology: बेस्ट पार्टनर..! दोघांचं छान जमेल; 4,13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांचे लकी मूलांक

Last Updated:
Numerology Matching: अंकशास्त्राद्वारे कोणाचं कोणाशी कसं जमेल, याचा अंदाज बांधता येतो. जन्मतारखेवरून मूलांक निश्चित होतात, मूलाकांचे एकमेकांशी कसे संबंध असतील हे जाणून घेता येतं. आज आपण मूलांक 4 विषयी जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक महत्त्वाचा मूलांक आहे.
advertisement
1/6
बेस्ट पार्टनर..! दोघांच छान जमेल; 4,13, 22, 31 जन्मतारखा असणाऱ्यांचे लकी मूलांक
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 4 असतो. हा अंक राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो, जो अनपेक्षितता, अचानक बदल आणि गूढता दर्शवतो.
advertisement
2/6
मूलांक 4 च्या व्यक्ती अत्यंत मेहनती आणि जिद्दी स्वभावाच्या असतात. एकदा एखादे उद्दिष्ट ठरवल्यावर ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या असतात. या लोकांना प्रत्येक काम शिस्तबद्ध आणि व्यवस्थित करायला आवडतं. ते उत्तम नियोजक असतात आणि कोणताही गोंधळ त्यांना आवडत नाही.
advertisement
3/6
भावनांपेक्षा तर्क आणि बुद्धीला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते निर्णय घेताना खूप विचारपूर्वक वागतात.ते स्वतःच्या भावना आणि योजना लवकर कोणासमोर व्यक्त करत नाहीत, त्यामुळे ते काहीसे गूढ वाटू शकतात. एकंदरीत अशाप्रकारच्या स्वभावामुळे मूलांक 4 असणाऱ्या लोकांचे कोणाशी जमते, याविषयी जाणून घेऊ. त्यांना पार्टनर म्हणून कोणते मूलांक सूट होतात, ते समजून घेऊया.
advertisement
4/6
मूलांक 1: मूलांक 1 (रवि) आणि मूलांक 4 (राहू) यांचा संबंध उत्तम असतो. दोघेही महत्त्वाकांक्षी असल्याने एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यात चांगली समज दिसून येते.
advertisement
5/6
मूलांक 2: मूलांक 2 (चंद्र) आणि मूलांक 4 यांच्यात चांगले संबंध राहू शकतात. दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करतात.
advertisement
6/6
मूलांक ६: मूलांक ६ (शुक्र) आणि मूलांक ४ यांच्यात चांगले नाते निर्माण होऊ शकते. मूलांक ६ च्या व्यक्ती मूलांक ४ च्या व्यक्तींच्या जीवनात आनंद आणि स्थिरता आणतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: बेस्ट पार्टनर..! दोघांचं छान जमेल; 4,13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांचे लकी मूलांक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल