TRENDING:

Numerology: प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात

Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात 5 हा अंक बुध ग्रहाचं प्रतिनिधत्व करतो. 5 हा अंक ‘लो शू’ ग्रीडच्या मध्यभागी असल्यामुळे तो इतर सर्व संख्यांची प्रेरक शक्ती मानला जातो. बहुतेक वेळा 5 या अंकाला सर्व आकड्यांपैकी सर्वात भाग्यवान अंक मानलं जातं.
advertisement
1/6
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
मागील जन्मातील दीर्घ परिश्रमांनंतर एखाद्या नशीबवान व्यक्तीचा जन्मांक 5 येतो. त्यामुळे अशा लोकांचं या जन्मातील नशीब मागील जन्माची भेट (गिफ्ट) मानलं जातं. 5 जन्मांक असलेल्या व्यक्ती सर्वांत भाग्यवान, अष्टपैलु, धाडसी, स्थितप्रज्ञ, देखण्या, प्रसिद्ध, मनाने चिरतरुण आणि सर्वांच्या आवडत्या असतात.
advertisement
2/6
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखेला झाला असेल, तर तुमचा जन्मांक पाच आहे. अशा व्यक्तींना बहुतेक वेळा त्यांच्या नशीबाची साथ मिळते. करिअरमध्ये स्थिरता येण्यासाठी आयुष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 5 या अंकाचा समावेश असणं आवश्यक आहे.
advertisement
3/6
पाच जन्मांकाच्या बहुतेक व्यक्तींचं आपल्या आकर्षकपणामुळे आणि रोमँटिक स्वभावामुळे ‘लव्ह मॅरेज’ होतं. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचं आणि लव्ह मॅरेजबद्दलच्या भावना पालकांना सांगण्याचं धाडस त्या करतात. 5 जन्मांकाच्या व्यक्ती बदल आणि साहसाचा आनंद घेतात; पण त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी व्यवसायात अडचणी येतात.
advertisement
4/6
तसंच प्रवास आणि वेगात गाडी चालवण्याच्या प्रेमामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यांनी गाडी चालवताना वेग कमी करणं आवश्यक आहे. या व्यक्तींनी झटपट पैसे कमवण्याच्या मार्गांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या हातून बेकायदेशीर कामं होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
जर तुमचा कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्राचा जन्मांक 5 असेल, तर अशा व्यक्तीचं प्रेम आणि स्नेह मिळवण्यासाठी त्याला किंवा तिला पूर्ण स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. जगातील बहुतेक लोकप्रिय आणि यशस्वी व्यक्ती 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या आहेत. दीपिका पदुकोण, आयुष्मान खुराना, मनीष मल्होत्रा, इम्रान खान, विराट कोहली, स्मृती इराणी अशा कितीतरी प्रसिद्ध व्यक्ती या तीन तारखांना जन्मलेल्या आहेत. ज्यांचा जन्मांक पाच आहे अशा व्यक्तींनी राजकारण, क्रीडा, ग्लॅमर, मीडिया आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये आपलं नशीब आजमावलं पाहिजे.
advertisement
6/6
पाच जन्मांक असलेल्या व्यक्तींनी खालील गोष्टी केल्या पाहिजेत. 1. प्रत्येक बुधवारी श्रीगणेशाची पूजा करा. 2. गणपतीला दुर्वा वाहा किंवा गुरांना हिरवा चारा खाऊ घाला. 3. दररोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चाला. 4. कायम स्वत: जवळ पंचमुखी रूद्राक्ष ठेवा. 5. शुभ रंग म्हणून हिरवा आणि पांढऱ्या रंगांचे कपडे घाला. 6. बुधवार हा आपला शुभ दिवस माना. 5 जन्मांक असलेल्या व्यक्तींनी मांसाहार, दारू, तंबाखू आणि चामड्याचा वापर टाळला पाहिजे. नाहीतर त्यांच्या आयुष्यात उलटफेर होतील आणि त्या भौतिक मोहाच्या जाळ्यात अडकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल