TRENDING:

Numerology: खडतर आयुष्य तिशीनंतर अनपेक्षित पालटतं! या 3 जन्मतारखा असलेले नंतर डबल धमाका करतात

Last Updated:
Numerology: ज्योतिषशास्त्रात शनि हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत या ग्रहाचे ज्यांचे स्थान मजबूत आहे त्यांना धन आणि सन्मान मिळतो. शनि हा अंक 8 शी संबंधित आहे आणि म्हणूनच, 8 मूलांक असलेल्यांवर शनिचा विशेष आशीर्वाद असतो. 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्यांचा 8 मूलांक असतो. हा मूलांक असलेल्यांचे गुण जाणून घेऊया.
advertisement
1/6
खडतर आयुष्य तिशीनंतर पालटतं! या 3 जन्मतारखा असलेले नंतर स्थिर-स्थावर होतात
बुद्धिमान आणि मेहनती - कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक तीक्ष्ण बुद्धीचे आणि अत्यंत मेहनती असतात. हे गुण त्यांना एके दिवशी महान व्यक्तिमत्व बनवतात. कठोर परिश्रमाने असे लोक आयुष्यात खूप प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवतात. त्यांना पराभूत करणे सोपे नसते.
advertisement
2/6
शनिचा वरदहस्त - या तीन तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनिचा विशेष वरदहस्त असतो. या मूलांकाचे लोक शांत, साधे आणि दयाळू असतात, त्यांना दिखाऊपणा आवडत नाही. ते नेहमी एकाग्रतेनं स्वतःच्या कामावर लक्ष देतात.
advertisement
3/6
कधीही हार मानत नाहीत - या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही हार मानत नाहीत. ते जे करायचे ठरवतात ते ते साध्य करतात. ते कठोर परिश्रमाला घाबरत नाहीत आणि आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला दृढनिश्चयाने तोंड देतात.
advertisement
4/6
वयाच्या तिशीनंतर मोठे यश मिळते - या मूलांकाचे लोक सहसा वयाच्या तिशीनंतर मोठे यश मिळवतात. आयुष्याच्या या टप्प्यावर, त्यांची सर्व स्वप्ने सत्यात उतरू लागतात आणि ते श्रीमंत बनतात. त्यांच्यामध्ये पैसे वाचवण्याची देखील चांगली क्षमता असते. या मूलांकाचे लोक अनावश्यकपणे पैसे खर्च करत नाहीत.
advertisement
5/6
हे लोक खूप मेहनती आणि अनुशासित असतात. ते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. 8 मूलांकाचे लोक पैशाचे उत्तम व्यवस्थापन करतात. ते धन कमावतात आणि त्याची योग्य बचत करणेही त्यांना जमते. त्यांच्यात नेतृत्व करण्याची आणि मोठ्या प्रकल्पांचे आयोजन करण्याची क्षमता असते. शनि हा न्यायाचा देव असल्यामुळे, हे लोक प्रामाणिक, निष्पक्ष आणि आपल्या कामाप्रती समर्पित असतात.
advertisement
6/6
मूलांक 8 संघर्ष आणि विलंब दर्शवतो. त्यामुळे या लोकांना यश सहजासहजी मिळत नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा ते स्थायी आणि मोठे असते (बहुतांश वेळा वयाच्या 30 वर्षांनंतर मोठे यश मिळते).(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: खडतर आयुष्य तिशीनंतर अनपेक्षित पालटतं! या 3 जन्मतारखा असलेले नंतर डबल धमाका करतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल