TRENDING:

Ratna Jyotish: संकटं आणि आर्थिक अडचणी होतील दूर, राशीनुसार रत्न तुम्हाला माहितीये का?

Last Updated:
Ratna Jyotish: राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीसाठी एक शुभ रत्न सांगितलं जातं. याबाबतच नाशिकचे रत्न अभ्यासक भावेश विसपुते यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13
संकटं आणि आर्थिक अडचणी होतील दूर, राशीनुसार रत्न तुम्हालामाहितीये का?
मेष राशी: राशी चक्रातील पहिली रास मेष ही आहे. मेश राशीचा गुरु हा मंगळ आहे. त्यामुले या राशीचा लोकांनी पोवळा हे रत्न धारण करावे.
advertisement
2/13
वृषभ राशी: राशी चक्रातील दुसरी राशी ही वृषभ आहे. वृषभ राशीचा ग्रह हा शुक्र आहे आणि शुक्र राशीच्या लोकांनी ओपेल किंवा डायमंड हे रत्न धारण करावे.
advertisement
3/13
मिथुन राशी: ही रास राशी चक्रात तिसऱ्या स्थानी आहे. मिथुन राशीचा ग्रह बुध असून या राशीच्या लोकांनी पन्ना रत्न धारण करावे.
advertisement
4/13
कर्क राशी: राशी चक्रात चौथ्या स्थानावर कर्क राशी आहे. हिचा ग्रह चंद्र असल्याने या राशीच्या लोकांनी मोती हे रत्न धारण करावे.
advertisement
5/13
सिंह राशी: राशी चक्रात पाचवी रास ही सिंह आहे. या राशीचा ग्रह सूर्य असून या राशीच्या लोकांनी माणिक रत्न धारण करावे.
advertisement
6/13
कन्या राशी: ही रास राशी चक्रात सहाव्या स्थानावर आहे. कन्या या राशीचा ग्रह बुध असून या लोकांनी देखील पन्ना हेच रत्न धारण करणे योग्य ठरते.
advertisement
7/13
तूळ राशी: राशी चक्रात सातव्या स्थानी तूळ रास असून या राशीचा ग्रह शुक्र आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी ओपेल हेच रत्न धारण करावे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी: राशी चक्रात आठव्या स्थानावर असणाऱ्या या राशीचा ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या लोकांनी पोवळा रत्न धारण करावे.
advertisement
9/13
धनु राशी: राशी चक्रात नवव्या स्थानावर ही रास आहे. या राशीचा ग्रह गुरू आहे. त्यामुळे या लोकांनी पुष्कराज हे रत्न धारण करावे.
advertisement
10/13
मकर राशी: ही रास राशीचक्रात दहाव्या स्थानावर आहे. या राशीचा गुरु शनि आहे. शनी ग्रह तापट स्वरुपाचा असल्याने या राशीच्या लोकांना निलम हे रत्न परिधान करावे.
advertisement
11/13
कुंभ राशी: राशी चक्रात अकराव्या स्थानावर कुंभ राशी आहे. या राशीचा ग्रह शनिच आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्या आयुष्यात निलम रत्नच धारण करावे.
advertisement
12/13
मीन राशी: राशी चक्रात शेवटच्या म्हणजेच बाराव्या स्थानावर मीन रास आहे. या राशीचा ग्रह गुरु असल्याने पुष्कराज हेच रत्न धारण करावे.
advertisement
13/13
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक आणि ज्योतिषीय श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ratna Jyotish: संकटं आणि आर्थिक अडचणी होतील दूर, राशीनुसार रत्न तुम्हाला माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल