TRENDING:

Shani Astro: साडेसातीचे चटके बसणार! अनेक संकटे एकत्र अंगावर; या राशींचा महाकठीण काळ सुरू

Last Updated:
Shani Sade Sati and Dhaiya effect: ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाचे देवता आणि क्रूर ग्रह मानले जाणारे शनिदेव राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. शनि ग्रह सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनिने मीन राशीत संक्रमण केले. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे घालवतात. शनीच्या संक्रमणामुळे काही राशींवर साडेसातीचा प्रभाव सुरू झालाय, तर काहींची एकदाची सुटका झालीय.
advertisement
1/6
साडेसातीचे चटके बसणार! अनेक संकटे एकत्र अंगावर; या राशींचा महाकठीण काळ सुरू
साडेसातीचा प्रभाव - २०२५ मध्ये शनीचा प्रभाव ३ राशींवर सर्वात जास्त असेल.साडेसातीच्या प्रभावामुळे विशेषत: तीन राशीच्या लोकांना धनहानी, आरोग्य, मानसिक ताण, नातेसंबंधांमध्ये दुरावा अशा त्रासदायक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
advertisement
2/6
कामाच्या ठिकाणी अडचणी - शनीच्या क्रूर दृष्टीमुळे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी एकामागून एक समस्या येत राहतील. या ३ राशी कोणत्या आहेत, ज्यांवर शनीचा अशुभ प्रभाव पडेल आणि या अशुभ प्रभावांपासून वाचण्यासाठी काय करावे? याबद्दलही जाणून घेऊ.
advertisement
3/6
मेष - शनीच्या वाईट प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. डोळे आणि पायांशी संबंधित आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जुलै ते नोव्हेंबर या काळात शनि वक्री असल्याने या लोकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. दर शनिवारी श्री बजरंग बाणाचे पठण केले तर शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो.
advertisement
4/6
धनु - शनीच्या वाईट प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. शत्रू वाढू शकतात. कामात सतत अडचणी येऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. कष्ट वाढू शकतात आणि नफा कमी होऊ शकतो.
advertisement
5/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती त्रासदायक ठरू शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या त्रस्त करू शकतात. वाढत्या आरोग्य समस्यांमुळे तुमचा मूड खराब होईल. कामाच्या ठिकाणी एकामागून एक अनेक आव्हाने उद्भवू शकतात.
advertisement
6/6
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी - शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी, गरीब आणि गरजूंना दान करा. शनिवारी शनिदेवाची पूजा करा, त्यांना मोहरी आणि तिळाचे तेल अर्पण करा. शनिवारी योग्य विधींसह हनुमान चालीसा पठण करणे लाभदायी ठरते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astro: साडेसातीचे चटके बसणार! अनेक संकटे एकत्र अंगावर; या राशींचा महाकठीण काळ सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल