TRENDING:

ShaniDev: तो दिवस दूर नाही! याच महिन्यात शनि मार्गी झाल्यावर तुमच्या राशीवर असा दिसणार परिणाम

Last Updated:
ShaniDev Margi Horoscope: शनि ग्रह 28 नोव्हेंबर 2025 रोजी मीन राशीत मार्गी होईल. वक्री असताना जी कामं थांबली होती किंवा ज्या अडचणी वाढल्या होत्या, त्या मार्गी झाल्यावर बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता असते. परंतु तरीही प्रत्येक राशीवर शनिच्या मार्गी होण्याचा कसा प्रभाव-परिणाम दिसेल याबाबत राशीनुसार जाणून घेऊ.
advertisement
1/12
तो दिवस दूर नाही! याच महिन्यात शनि मार्गी झाल्याचा तुमच्या राशीवर असा प्रभाव
मेष रास: मेष राशीच्या लोकांसाठी शनिची मार्गी अवस्था मिश्रित परिणाम देईल. साडेसातीचा प्रभाव असल्याने काही अडथळे असले तरी, अडलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
advertisement
2/12
वृषभ रास: वृषभ राशीसाठी शनि मार्गी होणे शुभ संकेत आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. तुमचे आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि पैसे सेव्हिंगला पडतील.
advertisement
3/12
मिथुन - करिअरमध्ये प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीमध्ये मनासारखी ट्रान्सफर मिळू शकते. व्यवसायाच्या विस्तारासाठी वेळ अनुकूल आहे. आर्थिक योजनांना गती मिळेल. जे लोक नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करू इच्छित आहेत, त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी जोडलेले निर्णय भविष्यात चांगला फायदा देतील.
advertisement
4/12
कर्क रास: कर्क राशीसाठी हा काळ अनुकूल असेल. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही नवीन कामात गुंतवणूक करू शकता, ते भविष्यात फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल.
advertisement
5/12
सिंह रास: सिंह राशीसाठी शनि मार्गी झाल्यावर काही अडचणी कमी होतील, पण आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, म्हणून संयम ठेवणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
advertisement
6/12
कन्या रास: कन्या राशीसाठी शनि मार्गी झाल्याने भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. वैवाहिक जीवनात काही सुधारणा दिसून येतील, पण जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/12
तूळ रास: तूळ राशीसाठी ही मार्गी अवस्था चांगली ठरू शकते. तुमच्या विरोधकांवर तुम्ही सहज विजय मिळवू शकाल. जुन्या कर्जातून किंवा दीर्घकाळ चाललेल्या समस्यांमधून मुक्तता मिळेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे.
advertisement
8/12
वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शिक्षण आणि मुलांशी संबंधित समस्या कमी होतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी काळ चांगला राहील.
advertisement
9/12
धनु रास: धनु राशीच्या लोकांसाठी घर, कुटुंब आणि मालमत्ता या संदर्भात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात शांतता नांदेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. आईच्या आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात.
advertisement
10/12
मकर रास: मकर राशीसाठी शनि मार्गी झाल्यावर आत्मविश्वास वाढेल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. भाऊ-बहिणींकडून सहकार्य मिळेल. कामासाठी लहान प्रवास करावे लागू शकतात, ते फायदेशीर ठरतील.
advertisement
11/12
कुंभ रास: कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मार्गी झाल्यावर अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील आणि बोलण्यात प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.
advertisement
12/12
मीन रास: मीन राशीसाठी साडेसातीचा मध्य टप्पा सुरू आहे. शनि मार्गी झाल्यावर काही प्रमाणात दिलासा मिळेल. मानसिक तणाव कमी होईल, पण आर्थिक बाबींमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतेही मोठे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: तो दिवस दूर नाही! याच महिन्यात शनि मार्गी झाल्यावर तुमच्या राशीवर असा दिसणार परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल