TRENDING:

Shani Shukra Yuti: मकर, वृषभसह या राशींना गुडन्यूज! शनि-शुक्राची युती लाख-मोलाची ठरणार, यश पदरात

Last Updated:
Shani Shukra yuti 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला विशेष महत्त्व दिलं जातं. नऊ ग्रहांचे सतत राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन, दोन ग्रहांमध्ये युती आणि त्यांचीतील काही विशेष कोनीय अंतर अशा गोष्टी होत राहतात. ज्योतिषशास्त्रात या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.
advertisement
1/5
मकर, वृषभसह या राशींना गुडन्यूज! शनि-शुक्राची युती लाख-मोलाची ठरणार, यश पदरात
सध्या वर्ष 2025 संपत आले असून उरलेले साधारण महिना सव्वा महिना काही राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. शुक्र आणि शनी या शेजारी-शेजारी असलेल्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना चांगला काळ अनुभवता येणार आहे.
advertisement
2/5
नवीन वर्ष 2026 मध्ये शनी आणि शुक्राचा विशेष योग जुळून येणार आहे, याचा चांगला प्रभाव काही राशीच्या लोकांवर आतापासूनच पाहिला मिळणार आहे. वर्ष 2025 सालातील उरलेले दिवस शनि-शुक्राच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना चांगले जाणार आहेत. त्यांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/5
मकर - शनिची रास असलेल्या मकर राशीच्या लोकांना या ग्रहांच्या स्थितीचा फायदा होणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि त्याचं सर्वजण कौतुक करतील, काही गुंतवणुक-जमीन व्यवहारात अडकलेल्या गोष्टी आता मार्गी लागतील, त्यामुळे मोठ्या कशातून तरी सुटका झाल्याचा आनंद मिळेल. आर्थिक गोष्टी मनासारख्या घडत असल्यानं दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
advertisement
4/5
मीन - शनि-शुक्राची ही युती मीन राशीच्या लोकांच्या पत्थावर पडणार आहे. मीन राशीच्या लोकांवर जरी साडेसातीचा खडतर टप्पा सुरू असला तरी आता त्यांना काही दिलासा मिळू शकतो. चांगल्या गोष्टी जीवनात अनपेक्षित होतील, गुडन्यूज तुम्हाला खुश करतील. पार्टनरशीपमध्ये बिजनेस करणारे आता चांगली प्रगती साधू शकतात, लाभाच्या संधी असतील. तसेच घरातील वातावरणसुद्धा आनंदाचे असेल.
advertisement
5/5
वृषभ - शनि-शुक्राची ही युती वृषभ राशीच्या लोकांनाही फायदा देणारी ठरणार आहे. जुनी केलेली गुंतवणूक आता जबरदस्त फायद्यात दिसू लागेल, चांगल्या डील्स तुमच्या समोर येतील. सरकारी काम होण्यात येत असलेल्या अडचणी आता सहज दूर झाल्यानं दिलासा मिळेल. नोकरी-धंद्यात चांगले दिवस पाहायला मिळतील, एकाहून अधिक चांगल्या संधी येऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Shukra Yuti: मकर, वृषभसह या राशींना गुडन्यूज! शनि-शुक्राची युती लाख-मोलाची ठरणार, यश पदरात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल